Cyber crime awaerness

नाशिक येथे होणा-या राष्ट्रीय सायबर कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून ॲड.चैतन्य भंडारी यांची निवड

नाशिक येथे होणा-या राष्ट्रीय सायबर कॉन्फरन्सच्या प्रमुख वक्ते म्हणून ॲड.चैतन्य भंडारी यांची निवड

धुळे / ज्ञानप्रवाह न्यूज- दि.४ फेब्रुवारी २०२४ रोजी नाशिक येथे होणा-या राष्ट्रीय सायबर सेक्युरिटी कॉन्फरन्ससाठी प्रमुख वक्ते म्हणून धुळे येथील सायबर तज्ञ ॲड.चैतन्य भंडारी यांची निवड झाली आहे.यात भारतभरातून विविध शाळा, महाविद्यालयातील विदयार्थी उपस्थित राहणार असून त्यांना भारतातील विविध भागातील सायबर तज्ञांचे मार्गदर्शन लाभणार आहे.

यात ॲड.चैतन्य भंडारी हे प्रमुख वक्ते म्हणून भूमिका मांडणार आहेत.सदरील राष्ट्रीय सायबर सेक्युरिटी कॉन्फरन्स,नाशिक चॅप्टरचे आयोजक स्वरदा कखनुरकर (व्हाईट बॅण्ड असोसिएटस्) यांनी आयोजित केली आहे.

सदरील राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये तपनकुमार झा,रिध्दी सोरल व दीपक राज राव दिल्ली या सायबर तज्ञांचा देखील समावेश असणार आहे. सदरील एकदिवसीय राष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये संपुर्ण भारतातून आलेल्या विदयार्थी, डॉक्टर, इंजिनिअर्स, शिक्षक तसेच सर्वसामान्य नागरिकांना ॲड.भंडारी हे मार्गदर्शन करताना सायबर सिक्युरिटी विषयी ज्ञान देणार आहेत.नागरिकांनी मोठ्या संख्येने या राष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये उपस्थित राहून सायबर सुरक्षिततेसंबंधी माहिती घ्यावी असे आवाहन ॲड चैतन्य भंडारी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *