शरद पवार हे धोकेबाज नाहीत तर ते देशाचे नेते आहेत – केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले

शरद पवार हे धोकेबाज नाहीत तर ते देशाचे नेते आहेत – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Sharad Pawar is not a threat but he is the leader of the country – Union Minister of State Ramdas Athawale
 पुणे ,दि.16/07/2021 -  शरद पवार हे देशाचे नेते आहेत. ते धोकेबाज नेते नाहीत. त्यांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवार म्हणून विरोधी पक्ष पुढे करीत आहेत.शरद पवार तयार असतील तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत. मात्र राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत ते विरोधी पक्षाच्या ताकदी वर निवडून येणार नाहीत.त्यांचा राष्ट्रपती निवडणुकीसाठी बळीचा बकरा करू नये असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात केले. 

 पुणे महापालिकेची आगामी  निवडणुक आम्ही भाजपसोबतच लढणार आहोत. पुन्हा आमचीच सत्ता येईल असे भाकीत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष ना.रामदास आठवले यांनी वर्तविले आहे.तसेच शिवसेना,काँग्रेस व राष्ट्रवादी वेगवेगळे लढले‌ तर आम्ही त्यांच्यावर मात करू असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

रामदास आठवले हे पुणे दौऱ्यावर आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर रोखठोक भाष्य केले.याप्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ,उपमहापौर सुनीता वाडेकर,परशुराम वाडेकर, सभागृह नेते गणेश बिडकर, नगरसेवक डॉ.सिद्धार्थ धेंडे, ऍड.आयुब शेख, हिमाली कांबळे, शशिकला वाघमारे, असीत गांगुर्डे,संजय सोनवणे उपस्थित होते.  

    राज्याच्या महाविकास आघाडी सरकारमध्ये कोणताही ताळमेळ नाही. तिन्ही पक्ष स्वबळाची आणि मानापमानाची भाषा करतात. आगामी निवडणुकांत राजकीय नुकसान टाळायचे असेल, तर शिवसेनेने पुन्हा भारतीय जनता पक्षासोबत युती करण्याची आवश्यकता आहे. भाजप व रिपब्लिकन पक्ष एकत्र असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची सत्ता येणे अवघड आहे. आगामी पालिका निवडणूक भाजपाच्या कमळ चिन्हावरच लढविली जाईल. मात्र, विधानसभा आमच्या चिन्हावर लढविण्याचा प्रयत्न आहे. भाजपाच्या‌ सहकार्याने रिपाइंला उपमहापौरपद मिळाले. 

पुण्याचा विस्तार होत असून, ४० लाखाच्या पुढे लोकसंख्या गेली आहे.त्यामुळे पालिकेचे विभाजन करून दोन पालिका अस्तित्वात यायला हव्यात. पुण्याच्या विकासासाठी केंद्राकडून जास्तीत जास्त मदत देण्यासाठी प्रयत्न करेन असेही आठवले यांनी सांगितले.नो कोरोना' नो कोरोना असा आठवलेंचा नवा नारा आहे. मी गो कोरोनाचा नारा दिला होता. त्याचा परिणाम सर्वत्र दिसून आला. आता, 'नो कोरोना नो कोरोना'चा नारा देत असल्याचे आठवले म्हणाले.

  महापालिकेच्या हद्दीत २३ गावे समावेश केल्याने शहराचे क्षेत्र वाढल्याने पुणे मनपा चे विभाजन करून दुसरी एक महापालिका करावी. राज्य‌ सरकारने पुण्यासाठी साडेचार एफएसआय द्यावा. जेणेकरून बिल्डर एसआरए साठी पुढे येतील आणि झोपडपट्टी धारकांना फायदा मिळेल.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: