आषाढी वारी असती तर वाखरी येथे लाखो भाविकांनी रिंगण सोहळा डोळ्यात साठवला असता
आषाढी वारी असती तर वाखरी येथे लाखो भाविकांनी रिंगण सोहळा डोळ्यात साठवला असता If it was Ashadi Wari today, millions of devotees would have watched the arena ceremony at Wakhri
शेळवे / संभाजी वाघुले - याही वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे प्रत्येक वर्षी भरणारी आषाढी वारी भरलेली नाही .यामुळे विठ्ठल भक्तांमधुन व सामान्य नागरिकांतुन वारीच्या व वाखरी रिंगण सोहळ्याच्या आठवणींना उजाळा दिला जात आहे.
भंडीशेगाव येथील ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्याच्या मुक्कामानंतर दुपारी 12 वाजता माऊलीचा पालखी सोहळा बाजीराव विहिरीवरील गोल रिंगणासाठी मार्गस्थ होत असतो .परंतु याही वर्षी आषाढी सोहळा नसल्याने आज भंडीशेगाव व बाजीराव विहीरीवर फक्त आठवणीतील वारी दिसत आहे.
एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजेच आषाढ शुध्द दशमीला ज्ञानेश्वर माउली , तुकोबाराया , सोपानकाका अशा बहुतेक पालख्या पंढरपुरात प्रवेश करतात.काही पालख्या आधीच पंढरपूरात पोचतात.यामध्ये संत मुक्ताबाई पालखी सोहळा असतो.
त्यापूर्वी आषाढ शुध्द नवमीला ज्ञानेश्वर माउली, तुकोबाराया, सोपानकाका यांच्या पालख्या वाखरी मुक्कामी येतात .वाखरी हे गाव पंढरपूरच्या पूर्वेस ८ किमी अंतरावर आहे .वाखरीला पोचण्यापूर्वी आषाढ शुध्द नवमीला बाजीराव विहीर येथे ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे उभे व गोल अशी दोन रिंगण होतात.याच ठिकाणी तुकोबांच्या पालखीचे व सोपानकाकांच्या पालखीचे रिंगण होते.ही विहीर दुसरे बाजीराव यांनी बांधली असल्याने या विहिरीला बाजीराव विहीर असे म्हणतात. या ठिकाणी रिंगण होऊन पालख्या वाखरीला मुक्कामी थांबतात .
दशमीला पंढरपूरातून संत नामदेवांची पालखी सर्व संत मेळ्याच्या स्वागतासाठी वाखरीकडे निघते. या बरोबरच पंढरपुरात आधी पोचलेली संत मुक्ताबाईंची पालखी असते. पंढरपूरातून निघालेला हा पालखी सोहळा वाखरी व पंढरपूर यामध्ये असलेल्या विठ्ठल रुक्मिणी पादुका मंदिरापाशी येतो. या ठिकाणी काही वेळ भजन , भारूड होते. ज्ञानेश्वर माउली पालखी सोहळ्याचे चोपदार येऊन स्वागतासाठी आलेल्या नामदेवरायांच्या पालखीला पंढरपूरकडे चालण्याची विनंती करतात. त्यानंतर हा पालखी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होतो. पालखी सोहळे पादुकांपाशी आल्यावर त्या त्या पालख्यांचे या ठिकाणी उभे रिंगण होते. हे सोहळ्यातील शेवटचे रिंगण असते. पालख्यांचा पंढरपूर प्रवेशाचा क्रम ठरलेला असून यात पहिल्या क्रमांकावर अर्थात सर्वात शेवटी ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा असतो. त्यांच्याआधी दुसऱ्या क्रमांकावर तुकोबारायांचा पालखी सोहळा असतो. सात मानाच्या पालख्यांचा क्रम पुढीलप्रमाणे आहे.
सर्वात पुढे
पंढरपूरातून स्वागताला आलेली संत नामदेवांची पालखी
संत मुक्ताबाई पालखी
संत सोपानकाका पालखी , सासवड
संत निवृत्तीनाथ पालखी , त्र्यंबकेश्वर
संत एकनाथ महाराज पालखी , पैठण
संत तुकाराम महाराज पालखी , देहू
संत ज्ञानेश्वर माउली पालखी , आळंदी
हा रिंगण सोहळा पाहण्यासाठी पंढरपुर,गादेगाव उपरी,सुपली,भाळवणी,वाखरी, शिरढोण, कौठाळी खेडभाळवणी, शेळवे, देवडे,वाडीकुरोली , भंडीशेगाव आदी गावांसह परगावाहुन ही लोक माऊलीचे गोल रिंगण सोहळा पाहण्यासाठी एकच गर्दी करत असायचे .लक्ष लक्ष नयनात हा रिंगण सोहळा भाविक साठवायचे व पुन्हा वर्षभरासाठी या वारीच्या आठवणीतच व विठ्ठलाच्या नामातच जीवन जगायचे .
बाजीराव विहीरीवरील रिंगण ठिकाणी रिंगणाला वेळ असल्यामुळे कोणी फुगडी खेळत होते तर कोणी भारूड गात होते तर कोणी भजन गात असायचे. आज याठिकाणी आल्यानंतर फक्त मागील वर्षीची सर्व चिञे डोळ्यासमोर ऊभी राहत होती .
आषाढी वारीतील बाजीराव विहीरीवरील हे शेवटचेच गोल रिंगण असायचे म्हणून हा रिंगण सोहळा प्रत्येकजण डोळ्यात साठवायचे.
बाजीराव विहीर येथील गोल रिंगणाच्या ठिकाणी पालखीने फेरी मारून माऊलीच्या पादुका रिंगण सोहळ्याच्या मध्यभागी ठेवलेल्या. यावेळी सर्वानीच हाथ उंचावुन जागेवरूणच माऊलीचे दर्शन घेतलेले .नंतर रिंगण सोहळ्यासाठी माऊलीचा अश्व व स्वाराचा अश्व रिंगणात दाखल झालेले व चोपदारांनी रिंगण लावलेले.यावेळी माऊलीच्या रथाच्या पुढील मानाच्या दिंडीतील पताकाधारी व मानकरी यांनी गोल कडे केललेे . यावेळी चोपदारांनी अश्वाला गोल रिंगण दाखवलेले .स्वाराचा अश्व व माऊलीचा अश्व यांनी काही क्षणात रिंगणाच्या फेर्या पुर्ण केल्याल्या या सर्व गोष्टी जशाच्या तशा डोळ्यासमोर ऊभा राहील्या.
यावेळी लाखो भाविकांनी माऊली माऊलीच्या जयघोषांनी रिंगण परिसर दुमदूमलेले .यावेळी अश्व धावलेल्या ठिकाणची धूळ कपाळाला लावण्यासाठी एकच गर्दी झालेली सर्वच्या सर्व गोष्टी बाजीराव विहीर येथे आल्यानंतर जशाच्या तशा डोळ्यासमोर उभ्या राहतात.