१०० कोटींचे विठठल हॅास्पीटल विठ्ठल कारखान्याकडे वर्ग करण्याची सभासदांची मागणी

१०० कोटींचे विठठल हॅास्पीटल विठ्ठल कारखान्या कडे वर्ग करण्याची सभासदांची मागणी Demand of members to transfer Rs. 100 crore to Vitthal Hospital Vitthal Factory
 पंढरपूर /प्रतिनिधी- श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या सभासदांच्या ऊसबीलातून रक्कम कपात करुन विठ्ठल हॅास्पीटलची उभारणी झाली असल्याने विठ्ठल हॅास्पीटल हे श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याकडे वर्ग करण्याची मागणी सभासदांमधून होऊ लागली आहे. याचे पडसाद म्हणून राष्ट्रवादीच्या वार्ता फलकावरही ही मागणी झाल्याने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.

 याबाबत वृत्त असे की,विठ्ठल साखर कारखाना व विठ्ठल हॅास्पीटलचे संस्थापक कर्मवीर औदुंबर आण्णा पाटील यांनी विठ्ठल कारखान्याच्या सभासदांच्या ऊसबीलातून रक्कम वजा करुन पंढरपूर येथे सभासदांच्या आरोग्याची मोफत काळजी घेण्यासाठी विठ्ठल हॅास्पीटलची उभारणी केलेली होती . मात्र औदुंबरआण्णांच्या या उदात्त व दुरदृष्टीच्या धोरणाचा विसर पडल्याने, विठ्ठल हॅास्पीटलचा फायदा विठ्ठल साखर कारखान्याच्या सभासदांना वा त्यांच्या कुटुंबियांना झाला नसल्याने विठ्ठल कारखान्याच्या सभासदांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. म्हणूनच राष्ट्रवादीच्या कार्यालयात विठ्ठल कारखान्याच्या सभासदांनी स्वयं बैठक घेऊन विठ्ठल हॅास्पीटल हे विठ्ठल कारखान्याकडे वर्ग केल्याशिवाय विठ्ठलच्या सभासदांना विठ्ठल हॅास्पीटलचा लाभ मिळणार नाही, असे स्पष्ट मत व्यक्त केले आहे. तसेच विठ्ठल हॉस्पिटलची स्थावर जंगम मालमत्ता हि अंदाजे १०० कोटींची आहे. या हॉस्पिटलने बांधलेल्या व्यापारी संकुलातसुद्धा एकही गाळा विठ्ठल कारखान्याच्या सभासदाला दिलेला नाही. सध्या विठ्ठल हॅास्पीटल हे खाजगी मालकीचे असल्या प्रमाणे वापरले जात आहे, ही खेदाची बाब असल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले आहे

श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना वेणूनगर च्या सभासदांनी श्री विठ्ठल हाॅस्पिटल, पंढरपूर हे कारखान्याच्या सभासदांच्या उसाच्या बिलातून रक्कम कट करुन उभारणी केली आहे त्यामुळे विठ्ठल हाॅस्पिटल हे कारखान्याच्या सभासदांकडे वर्ग करुन सभासदांना न्याय मिळावा अशी मागणी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाकडे केली आहे . यावर कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल – सुभाष वसंतराव भोसले व सभासद श्रीविठ्ठल सहकारी कारखाना वेणूनगर पंढरपूर

    सभासदांच्या स्वयं बैठकीला अनेक सभासद हजर असल्याचे पंढरपूरचे माजी नगराध्यक्ष सुभाष भोसले, संदीप मांडवे,कलावती म्हमाने च्या वतिने सुहास म्हमाने,दत्तात्रय कांबळे,किसन कांबळे, जाबवंत कांबळे,वासुदेव कांबळे,हेमंत भोसले, विठ्ठल रोंगे,बाळासाहेब यलमार पाटील आदिंसह अनेक सभासद उपस्थित होते .

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: