राजकीय न्यूज

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पंढरपूर,दि:०३- राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे सपत्नीक दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल व श्री विठ्ठल- रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी माजी आमदार प्रशांत परिचारक, उपवन संरक्षक धैर्यशील पाटील,तहसीलदार सचिन लंगोटे,नायब तहसीलदार मनोज श्रोत्री यांच्यासह मान्यवर पदाधिकारी व मंदिर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *