सध्या राज्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. हवामान खात्यानं राज्यातील काही जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यातील सातारा, रत्नागिरी, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्याना रेड अलर्ट दिले आहे.
रायगड, कोल्हापूर, इतर दक्षिणी जिल्ह्यात मुसळधार पावसासह ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.तसेच पालघर, ठाणे, नागपूर, वर्धा, रायगड, सिंधुदुर्ग, पुणे अमरावती, या आठ जिल्ह्यात हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
या जिल्ह्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. या भागातील नागरिकांना आवश्यक खबरदारी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
येत्या 22 जुलै पर्यंत हवामान खात्यानं हलक्या मेघसरी कोसळण्याची शक्यता वर्तवली आहे. पुणे शहरात हलक्या सरी तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.कोकण घाटमाथा आणि विदर्भात आज मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
कोकण किनारपट्टी भागात गेल्या 3 ते 6 दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. भारतीय हवामान खात्यानं राज्यातील 6 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. येणारे हे चार दिवस महत्त्वाचे असल्याचे सांगितले जात आहे. पावसासोबत वादळाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.
नदी नाल्यांना पूर आले आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे. यवतमाळ जिल्ह्यत येत्या पाच दिवस यलो अलर्ट दिले आहे.
Edited by – Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.