भोसे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात शिवसैनिक पोहचणार घराघरात

पंढरपूर तालुक्यात शिवसंपर्क अभियानाचा भोसे येथून शुभारंभ Bhose Zilla Parishad and Panchayat Samiti group will reach Shiv Sainik from house to house

भोसे /प्रतिनिधी – शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्हा शिवसेना संपर्क प्रमुख आमदार तानाजी सावंत, जिल्हा समन्वयक प्रा.शिवाजी सावंत यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पंढरपूर विभागात शिवसंपर्क अभियान राबिवण्यास सुरुवात झाली. पंढरपूर तालुक्यात भोसे येथील यशवंत सभागृह येथे करण्यात आला.

यावेळी या जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेनेचे कार्य,शिवसेनेच्या पुढाकाराने व राज्य शासनाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या विविध कल्याणकारी योजना घरघरात,गावागावात पोहोचवाव्यात असे आवाहन शिवसैनिकांना केले. 

यावेळी बोलताना ते म्हणाले की,शिवसैनिकांची सदस्य नोंदणी करणे,विविध गावात नवीन शाखा स्थापन करणे,शिवसेना प्रणित महिला आघाडी, युवा सेना यांच्या शाखा वाढविणे,जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लक्षात घेत मतदारांची नोंदणी करणे आदी उपक्रम राबिवण्यात येणार आहेत.

    शिवसंपर्क अभियानाच्या शुभारंभानिमित्त शिवसेना तालुका प्रमुख महावीर देशमुख यांनी मार्गदर्शन केले आ हे शिवसंपर्क अभियान राबिवण्यात येत असल्याचे सांगत शिवसैनिकांनी याबाबत दक्षता घेण्याची सूचना केली. 

  यावेळी शिवसेनेचे विविध पदाधिकारी,शाखा प्रमुख आणि शिवसैनिक भोसे जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणात प्रत्येक वाडीवस्तीवर, गावागावात,घराघरात जाऊन शिवसेनेची भूमिका समजावून सांगणार आहेत.अनेक ठिकाणी नव्याने शिवसेना शाखा स्थापन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

 या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे, तालुका प्रमुख महावीर देशमुख,जेष्ठ शिवसैनिक भगवान जमदाडे,विभाग प्रमुख प्रशांत जाधव, गटप्रमुख शुभम चव्हाण,शाखा प्रमुख विलास कोरके,सुहास तळेकर,महेश सुरवसे,नागनाथ सुरवसे,उमेश घोडके,पांडुरंग सावंत,कुमार शेळके, नागनाथ माळी यांच्यासह शिवसेनेचे भोसे जिल्हा परिषद गटातील विविध पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: