श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याची तुळशी माळ अर्पण
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.04: श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस श्रीमती अलका अंकुश घाडगे रा.आनंदनगर टाकळी रोड, पंढरपूर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्सिम भक्त यांनी श्रींच्या चरणी सुमारे 5 लक्ष किमतीची सोन्याची तुळशी माळ अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
त्याबद्दल देणगीदार श्रीमती अलका अंकुश घाडगे यांचा सत्कार मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा व उपरणे देऊन करण्यात आला.यावेळी देणगीदार श्रीमती अलका अंकुश घाडगे यांचे कुटुंब उपस्थित होते.

या सोन्याच्या तुळशी माळेला 43 पाने व 88 व्हर्टिकल मनी आहेत. त्याचे अंदाजे वजन 60.78 ग्रॅम असून 5 लक्ष 14 हजार इतकी किंमत होत आहे.
सोने चांदी देणगी स्वीकारण्यासाठी स्वतंत्र विभाग आहे. त्यासाठी अनुभवी व तज्ञ सराफाची नियुक्ती करण्यात आली आहे. सोने-चांदी देणगी देणाऱ्या भाविकांना संगणकीय प्रणाली द्वारे पावती देण्यात येते. तरी इच्छुक भाविकांनी मंदिर समितीच्या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन मंदिर समितीच्यावतीने श्री श्रोत्री यांनी केले.