महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांचा एकत्रित उद्घाटन सोहळा विधानभवनात होणार

महाराष्ट्र विधान मंडळाच्या समित्यांचा एकत्रित उद्घाटन सोहळा १४ मे बुधवार रोजी विधान भवनात होणार

मुंबई/ ज्ञानप्रवाह न्यूज:- महाराष्ट्र विधान मंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठीच्या समित्यांचे एकत्रित उद्घाटन कार्यक्रम १४ मे बुधवार २०२५ रोजी. सकाळी११.३० वाजता विधान भवनातील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला आहे.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या सन २०२४-२०२५ या वर्षासाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या समित्या २३ एप्रिल २०२५ रोजी समित्या शासनाने जाहीर केल्या होत्या या सर्व समित्यांचे एकत्रित उद्घाटनाचा कार्यक्रम बुधवार दिनांक१४ मे २०२५ रोजी. सकाळी ११.३० वाजता विधानभवनातील चौथ्या मजल्या वरील मध्यवर्ती सभागृहात आयोजित केला आहे.या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे मार्गदर्शन करतील.

यावेळी विधानपरिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे, विधान सभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे विचार मांडतील तसेच विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे व संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत दादा पाटील हे या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतील.

महाराष्ट्र विधानसभेच्या समित्या व त्यांचे अध्यक्ष पुढील प्रमाणे
१) अर्जुन खोतकर अंदाज समिती एकूण सदस्य संख्या २३
२) विजय वडेट्टीवार लोकनेता समिती , एकूण सदस्य संख्या २०
३) ऍड.राहुल कुल सार्वजनिक उपक्रम समिती एकूण सदस्य संख्या २०
४) संतोष दानवे पंचायतराज समिती एकूण सदस्य संख्या २०
५) सुनील शेळके रोजगार हमी योजना समिती एकूण सदस्य संख्या २०
६) प्रतापराव पाटील चिखलीकर उपविधान समिती एकूण सदस्य संख्या १४
७) नारायण कुचे अनुसूचित जाती कल्याण समिती एकूण सदस्य संख्या ११
८) सुहास कांदे विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती एकूण सदस्य संख्या ११
९) श्रीमती मोनिका राजळे महिला व बालकांचे हक्क आणि कल्याण समिती एकूण सदस्य संख्या ११
१०) किशन कथोरे इतर मागासवर्ग कल्याण समिती एकूण सदस्य संख्या ११
११) मुरजी पटेल अल्पसंख्यांक कल्याण समिती एकूण सदस्य संख्या १२
१२) आशुतोष काळे मराठी भाषा समिती एकूण सदस्य संख्या१२
१३) नरेंद्र भोंडेकर विशेष अधिकार समिती एकूण सदस्य संख्या १६
१४) अण्णा बनसोडे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष विनंती अर्ज समिती एकूण सदस्य संख्या ११
१५) रवी राणा आश्वासन समिती एकूण सदस्य संख्या १९
१६) एडवोकेट राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नियम समिती एकूण सदस्य संख्या ११
१७) डॉ. किरण लहाने सदस्य अनुपस्थिती समिती एकूण सदस्य संख्या ११
१८) चंद्रदीप नरके, अशासकीय विधेयके व ठराव समिती एकूण सदस्य संख्या ११
१९) अण्णा बनसोडे महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्ष सभागृहाच्या पटलावर कागदपत्र ठेवण्याबाबत तदर्थ समिती एकूण सदस्य संख्या १०
२०) अजित पवार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती एकूण सदस्य संख्या ११
२१) अजित पवार उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री विधान मंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत संयुक्त समिती एकूण सदस्य संख्या ११
२२) प्राध्यापक राम शिंदे महाराष्ट्र विधान परिषद सभापती
ॲड.राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष सह समिती प्रमुख
ग्रंथालय समिती एकूण सदस्य संख्या १५
२३) शिवेंद्रसिंह भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आमदार निवासी व्यवस्था समित एकूण सदस्य संख्या १२
२४) डॉक्टर बालाजी किणी कर आहार व्यवस्था समिती एकूण सदस्य संख्या ११
२५)ॲड.आशिष जयस्वाल विधी व न्याय राज्यमंत्री धर्मादाय खाजगी रुग्णालयाची तपासणी करणे या संदर्भातली समिती एकूण सदस्य संख्या २१
२६) विधान मंडळ सदस्यांचा समावेश असलेले एड्स चर्चा पीठ(Forum) समिती या समितीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्यासह आरोग्य मंत्री प्रकाश आबीट कर व आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्यासह एकूण सदस्य संख्या १५
२७) प्राध्यापक राम शिंदे विधानपरिषद सभापती व सह समिती प्रमुख एडवोकेट राहुल नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष वातावरणीय बदल संदर्भातील संयुक्त तदर्थ समिती एकूण सदस्य संख्या १४
महाराष्ट्र विधान परिषदेतील समित्या पुढील प्रमाणे
१) श्रीकांत भारतीय अंदाज समिती एकूण सदस्य संख्या ५
२) कृपाल तुमाने लोकलेखा समिती एकूण सदस्य संख्या ५
३) निरंजन डावखरे सार्वजनिक उपक्रम समिती एकूण सदस्य संख्या ४
४) परिणय फुके पंचायतराज समिती 19 सदस्य संख्या ५)

५) योगेश टिळेकर रोजगार हमी समिती एकूण सदस्य संख्या ३
६) श्रीमती उमा खापरे उपविधान समिती एकूण सदस्य संख्या ४
७) अमित गोरखे अनुसूचित जाती कल्याण समिती एकूण सदस्य संख्या ४
८) श्रीमती उमा खापरे अनुसूचित जमाती कल्याण समिती एकूण सदस्य संख्या ४
९) ज्ञानेश्वर म्हात्रे विमुक्त जाती व भटक्या जमाती कल्याण समिती एकूण सदस्य संख्या ४
१०) श्रीमती चित्रा वाघ महिला व बालकांचे हक्क कल्याण समिती एकूण सदस्य संख्या ४
११) विक्रांत पाटील इतर मागासवर्ग कल्याण समिती एकूण सदस्य संख्या ४
१२) वसंत खंडेलवाल अल्पसंख्यांक कल्याण समिती एकूण सदस्य संख्या ४
१३) संजय केनेकर मराठी भाषा समिती एकूण सदस्य संख्या ४
१४) प्राध्यापक राम शिंदे विधान परिषद सभापती विधानपरिषद कामगार सल्लागार समिती एकूण सदस्य संख्या ९
विशेष निमंत्रक सदस्य संख्या ६
१५) प्रसाद लाड विशेष हक्क समिती एकूण सदस्य संख्या ११
१६) डॉक्टर नीलम गोर्हे विधानपरिषद उपसभापती विनंती अर्ज समिती प्रमुख सदस्य संख्या ५
१७) प्रवीण दरेकर आश्वासन समिती एकूण सदस्य संख्या ९
१८) प्राध्यापक राम शिंदे महाराष्ट्र विधान परिषद सभापती नियम समिती एकूण सदस्य संख्या १०
१९) डॉ. नीलम गोऱ्हे महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती व शासकीय विभाग समिती एकूण सदस्य संख्या ७
२०) डॉ. नीलम गोऱ्हे विधान परिषद उपसभापती सभागृहाच्या पटलावर कागदपत्र ठेवणे बाबत पदार्थ समिती एकूण सदस्य संख्या ८
२१) वसंत खंडेलवाल सदस्यांचे वेतन व भत्ते याबाबत संयुक्त समिती एकूण सदस्य संख्या ५
२२) राजहंस सिंह विधानमंडळाच्या माजी सदस्यांच्या निवृत्तीवेतनाबाबत संयुक्त समिती एकूण सदस्य संख्या ५
२३) प्राध्यापक राम शिंदे विधानपरिषद सभापती ग्रंथालय समिती व अडवोकेट राहुल . नार्वेकर महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष ग्रंथालय समिती प्रमुख
एकूण सदस्य संख्या ८
२४) विक्रांत पाटील आमदार निवास व्यवस्था समिती एकूण सदस्य संख्या ५
२५) सदाशिव खोत व्यवस्था समिती एकूण सदस्य संख्या ४
२६) प्रवीण दरेकर धर्मादाय खाजगी रुग्णालयांची तपासणी करणे या संदर्भातली तदर्थ संयुक्त समिती एकूण सदस्य संख्या ६
२७) एड्स या रोगावर प्रभावीरित्या आळा घालण्यासाठी विधिमंडळ सदस्यांच्या समावेश असलेल्या चर्चा पीठ (FoRUM) ची समिती विधान परिषद सभापती प्राध्यापक राम शिंदे व विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह अध्यक्ष देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्यासह एकूण सदस्य संख्या ७
२८) प्राध्यापक राम शिंदे सभापती विधान परिषद सभापती व सह समिती प्रमुख एडवोकेट राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष वातावरणीय बदला संदर्भातील संयुक्त तदर्थ समिती एकूण सदस्य संख्या ४ व विशेष निमंत्रित ३ अशा महाराष्ट्र विधानसभेच्या व महाराष्ट्र विधान परिषदेच्या समित्या असून या समित्यांचे सदस्यांसह समिती प्रमुख असलेल्या समित्यांचे उद्घाटन कार्यक्रम बुधवार १४ मे रोजी. विधानभवनातल्या चौथ्या मजल्यावरील सभागृहात पार पडणार आहे.

Leave a Reply

Back To Top