नूतन प्रशासकीय अधिकारी (वर्ग-१) कु. तेजश्रीताई लेंडवे यांचा आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते सत्कार
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत घेण्यात आलेल्या अभियांत्रिकी प्रशासकीय परीक्षेत अलौकिक यश संपादन करणाऱ्या नूतन प्रशासकीय अधिकारी (वर्ग-१) कु.तेजश्रीताई भारत लेंडवे यांचा आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय मंगळवेढा येथे अभिनंदनपर सत्कार करण्यात आला.
अथक परिश्रम, समर्पण आणि जिद्दीच्या बळावर तुम्ही हे दैदिप्यमान यश संपादन केले आहे. तुमच्या या ऐतिहासिक यशाने अनेक नवोदित विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल आणि तेही आपल्या ध्येयपूर्तीसाठी अधिक जोमाने प्रयत्न करतील. सेवा,समर्पण,अनुशासन आणि प्रगल्भ दृष्टिकोन असलेल्या प्रशासकीय व्यवस्थेसाठी तुमचा प्रवास निश्चितच महत्त्वपूर्ण ठरेल.

समाजहितासाठी तुमचे कार्य उज्ज्वल भविष्यात नवी उंची गाठो अशा शुभेच्छा आमदार समाधान आवताडे यांनी दिल्या.
यावेळी लोकनियुक्त सरपंच विनायक यादव, माजी प्राचार्य साहेबराव लेंडवे सर, माजी उपसरपंच वसंत लेंडवे, मंगळवेढा तालुका शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे तालुकाध्यक्ष भारत लेंडवे सर,तानाजी लेंडवे, उद्योजक चेअरमन नवनाथ लेंडवे, संकेत लेंडवे आदी उपस्थित होते.

