टेंभुर्णी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान
माढा/ज्ञानप्रवाह न्यूज- टेंभुर्णी ता.माढा येथे महाराष्ट्र शासना च्यावतीनं महसूल आणि वन विभाग यांच्या पुढाकाराने टेंभुर्णी सर्कल मधील गावांसाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आलं.

या अभियानांमध्ये विविध विभागांकडून नागरिकांना शासकीय कामकाजातील दाखले, प्रमाणपत्रे व सेवा तत्काळ उपलब्ध करून देण्यात आली.यामध्ये आरोग्य विभाग १६००, ग्रामपंचायत विभाग १५०, कृषी विभाग ७०, महावितरण ८५, भूमी अभिलेख ४८, उत्पन्न दाखले ३४५, अधिवास दाखले १०८ अशा सेवा दिल्या गेल्या.याशिवाय १०० हून अधिक जनावरांना लसीकरण करण्यात आले.

या उपक्रमामुळे टेंभुर्णी पंचक्रोशीतील नागरिकांचे अनेक प्रश्न व शासकीय कामे स्थानिक पातळीवरच मार्गी लागली. विशेषतः विद्यार्थ्यांना त्याचा मोठा फायदा झाल्याचं दिसून आलं.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य भारत शिंदे, भारत पाटील, बाळासाहेब ढवळे, सरपंच सौ.सूरजाताई बोबडे,रावसाहेब देशमुख, मा.सरपंच प्रमोद कुटे,चेअरमन औदुंबर देशमुख, वैभव देशमुख,वैभव कुटे,विलास पाटील, विजय कोकाटे,पप्पू कदम तसेच तहसीलदार सौ.शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार श्री.भडकवाड, सर्कल ऑफिसर श्री.शेळवणे यांच्यासह अनेक विभागातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
