केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आ.समाधान आवताडे यांच्या मागण्यांना हिरवा कंदील

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून आ. समाधान आवताडे यांच्या मागण्यांना हिरवा कंदील Union Minister Nitin Gadkari Samadhan Avtade’s demands are given a green light

मंगळवेढा /प्रतिनिधी : मंगळवेढा पंढरपूर राज्य महामार्गापासून मंगळवेढा सांगोलापर्यंत बाह्य वळण रस्ता भूसंपादन करून विकसित करण्या संदर्भात आ.समाधान आवताडे यांनी नुकतीच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेवून पत्राव्दारे मागणी केली होती.यावेळी त्यांच्या समवेत माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर उपस्थित होते.

मंगळवेढा आणि पंढरपूर ही दोन्ही शहरे तीर्थक्षेत्रे असल्याने आषाढी व कार्तिकी एकादशी दरम्यान होणारी भाविकांची गर्दी,कर्नाटक राज्य,कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पंढरपूरहून होणारी अवजड वाहतूक आणि या अनावश्यक अवजड वाहतुकी मुळे मंगळवेढा शहरात होणारी वाहतूक कोंडी या सर्वांवरच कायमस्वरूपी उपाय योजना होणार आहे.

त्याचवेळी अपघातांचे प्रमाण देखील कमी होऊन या बाह्यवळण मार्गाच्या लगत असणाऱ्या गावांना व्यापार,औद्योगिक सुधारणा आणि दळणवळणा च्या सोयीसाठी उपयुक्त देखील ठरणार असल्याने आ.आवताडे यांनी ही मागणी केली होती.

त्याचबरोबर सोलापूर रत्नागिरी महामार्ग क्रमांक – 166 चे सर्वेक्षण करताना बोराळे गावाकडे जाणारा रस्ता पूर्णतः बंद होणार असल्यामुळे सदर ठिकाणी बोगदा अथवा उड्डाण पूल करण्याची मागणी येथील स्थानिक नागरिकांनी केली होती. आशिया खंडात प्रसिद्ध असलेल्या मंगळवेढा मालदांडी ज्वारी उत्पादनापैकी जवळपास 90 टक्के ज्वारीचे उत्पादन हे या भागात होत असल्यामुळे येथे अनेक शेतकऱ्यांची आणि नागरिकांची नेहमी मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी बोगदा अथवा उड्डाणपूलची मागणी आता जोर धरू लागली आहे. शेतकऱ्यांच्या व येथील स्थानिक नागरिकांच्या मागणीची कदर करीत आ. समाधान आवताडे यांनी ही मागणी दिल्ली दौऱ्या वर असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कडे मांडली असता या मागणीची निकड लक्षात घेऊन ना.गडकरी यांनी आ.आवताडे यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.

     बेगमपूर गावातील बंधाऱ्याऐवजी तामदर्डी गावात बंधारा बांधणे,माचणूर गावातील रहाटेवाडी माचणूर छेदरस्त्याच्या ठिकाणी भुयारी मार्ग करणे, बोराळे ॲप्रोच रस्त्याला भुयारी मार्ग तयार करणे अशा प्रकारच्या काही नवीन सुधारणाही या रस्त्याच्या बांधकामाकरिता काही ठिकाणी करण्याची विनंती आ.समाधान आवताडे यांनी ना.नितीन गडकरी यांना पत्राद्वारे केली होती.  

बाह्यवळण रस्ता बांधण्यासाठी करावी लागणारी दुरूस्ती जमीन अधिग्रहण जागेच्या उपलब्धतेसह इतर बाबींबाबतचा व मंगळवेढा-बोराळे तसेच माचणूर रहाटेवाडी उड्डाणपूल बाबतचा अहवाल लवकरात लवकर नागपूर येथील गडकरी यांच्या कार्यालयाकडे सुपूर्द करण्याचा आदेश ना.नितीन गडकरी यांनी दिला आहे

      त्यामुळे लवकरच या रस्त्यासंदर्भात पुढील कार्यवाहीला सुरुवात होणार असल्याचे शुभसंकेत मिळाले आहेत.आ.आवताडे यांनी सदर रस्त्या लगत असणाऱ्या स्थानिक नागरिकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यासाठी आवश्यक पाऊले उचल्याने व पाठपुरावा केल्याने ही मागणी मंजूर झाल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: