छगन भुजबळ मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाबद्दल म्हणाले….

[ad_1]

chhagan bhubal
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राजभवन येथे महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही उपस्थित होते. महाराष्ट्राच्या मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर भुजबळ म्हणाले, '…हे मुख्यमंत्री ठरवतील. मला कोणतीही जबाबदारी दिली तरी चालेल…'

ALSO READ: शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याच्या गाडीवर जोरदार गोळीबार, थोडक्यात बचावले

मिळालेल्या माहितनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात परतले आहे. मंगळवारी सकाळी १० वाजता त्यांनी राजभवनात शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी त्यांना शपथ दिली. सोमवारी रात्री भुजबळ यांनी त्यांना मंत्रीपदाची शपथ घेण्याबाबत कळवण्यात आल्याची पुष्टी केली होती. ७७ वर्षीय नेते हे महाराष्ट्राच्या राजकारणात ओबीसी समुदायाचा एक प्रमुख चेहरा मानले जातात आणि ते माजी कॅबिनेट मंत्री आणि उपमुख्यमंत्री देखील राहिले आहे.

ALSO READ: पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला बॉम्बची धमकी, पोलिसांनी इमारत रिकामी केली

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'छगन भुजबळ जी यापूर्वीही मंत्री राहिले आहे. त्यांनी अनेक विभागांचे नेतृत्व केले आहे आणि ते एक अनुभवी नेते आहे… मी त्यांचे खूप खूप अभिनंदन करतो. त्यांच्या अनुभवाचा सरकारला नक्कीच फायदा होईल.

 

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: राज्यातील गरिबांना मिळणार नवीन घरे, नवीन गृहनिर्माण धोरण मंजूर, कोणाला फायदा होईल ते जाणून घ्या

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top