स्व.रतनचंद शहा यांच्या पुण्यस्मरणानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज दि.२३/०७/२०२४- स्व. रतनचंद शहा यांच्या १८ व्या पुण्यस्मरणानिमित्त गुरुवार दि.२५/७/२०२४ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये दि.२५/७/२०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता रक्तदान शिबीराचे श्री संत दामाजी महाविद्यालय,मंगळवेढा येथे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील विविध भागात सकाळी ९.३० वा.वृक्षारोपण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सकाळी १०.३० वाजता मुकबधीर विद्यालय, मंगळवेढा येथे खाऊ वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

सकाळी ११ ते ४ या वेळेत मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर नॅब नेत्र रुग्णालय,मिरज यांच्या सौजन्याने रतनचंद शहा बँकेसमोरील पटांगण येथे करण्यात येणार आहे.

सायंकाळी ५.३० वा.स्व.रतनचंद शहा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे.
सायंकाळी ६.०० वा.प्रशांत देशमुख खोपोली यांचे जगणे सुंदर आहे या विषयावरील व्याख्यानाचे रतनचंद शहा बँकेसमोरील पटांगणावर आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन राहुल सुभाष शहा स्व.रत्नप्रभा प्रतिष्ठान, मंगळवेढा यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top