सांग सांग भोलेनाथ…सोलापूरची विमानसेवा सुरू होईल का ?- काँग्रेस पक्षाचे अनोखे आंदोलन
बोलघेवडे भाजप सरकार,विमानसेवा सुरू करण्यासाठी नुसते तारीख पे तारीख, विमान सेवा कधी सुरू होणार :- चेतन नरोटे
सोलापूरची विमानसेवा सुरू न झाल्यास कोणत्याही VIP चे विमान उतरू देणार नाही – विनोद भोसले
सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६ मे २०२५- सोलापूरकरांना विमानसेवेचे सातत्याने आश्वासन देऊनही विमानसेवा चालू न करता वारंवार सोलापुरकरांच्या भावनेशी खेळणाऱ्या भाजप केंद्र व राज्य सरकार विरोधात खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या नेतृत्वाखाली संयोजक विनोद भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत अनोखे आंदोलन करत प्रतिकात्मक नंदीबैलाला विचारण्यात आले की,सांग सांग भोलानाथ…. सोलापुरात विमानसेवा सुरू होईल काय?….
भोलेनाथ सरकारला सुबुद्धी सुचेल काय?…
सोलापूरकरांच्या भावनेशी खेळणे हे सरकार बंद करेल काय?…
सांग सांग भोलानाथ… असे म्हणत प्रतिकात्मक विमाने उडविण्यात आली.
यावेळी झोपलेले सरकार जागे होईल काय- विमान सेवा सुरू होईल काय, सुरू करा सुरू करा – विमानसेवा सुरू करा यासारख्या घोषणाबाजीने विमानतळ परिसर दुमदुमून गेला होता.

यावेळी शहर अध्यक्ष चेतन नरोटे म्हणाले की,खासदार प्रणिती शिंदे या सोलापूरच्या विमानसेवेचा प्रश्न संसदेत मांडून विमानसेवा सुरू करण्यासाठी प्रयत्न करत आहेत पण देशात,राज्यात भाजपचे सरकार असूनही गेल्या अनेक वर्षापासून सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासने देत आहेत.अनेक तारखा दिल्या गेल्या.तिकीट बुकिंगची तारीखही जाहीर करण्यात आली होती पण आजपर्यंत विमानसेवा काही सुरू होऊ शकली नाही.पूर्वीपासून असलेल्या विमानतळाला रंग देऊन नोव्हेंबर मध्ये पंतप्रधान मोदींनी विमानतळाचे पुन्हा एकदा उद्घाटन केले.उपमुख्यमंत्री फडणवीस आणि नागरी उड्डाण मंत्री मुरलीधर मोहोळ यांनीही जाहीर केले विमानसेवा लवकर सुरू होईल असे सांगितले. आणखी किती वेळा सोलापूरकरांच्या भावनेशी भाजपवाले खेळणार आहेत.आता लोकांचा यांच्यावर विश्वास राहिला नाही.बोलघेवडे सरकार असून सोलापुरकरांना फसवत आहेत. आम्ही आज सोलापूरच्या नागरिकांच्या, व्यापाऱ्यांच्यावतीने जाहीरपणे विचारत आहोत की सोलापूरची विमानसेवा कधी सुरू होणार,सरकारने आता सोलापूरकरांचा अंत पाहू नये विमानसेवा लवकर सुरू करावी.

यावेळी संयोजक माजी नगरसेवक विनोद भोसले म्हणाले की,गेल्या अडीच ते तीन वर्षा पासून सोलापूरची विमानसेवा सुरू करतो त्यासाठी साखर कारखान्याची चिमणीचा अडसर आहे म्हणून चिमणी पाडली. DGCA ने सुद्धा सोलापूर आणि अमरावतीला विमानसेवेची परवानगी दिली होती अमरावतीला विमानसेवा सुरू झाली.मग विमानसेवा का सुरु होत नाही.विमानसेवा नसल्यामुळे मोठ्ठे उद्योग सोलापूरला यायला तयार नाहीत असे उद्योगपतींचे म्हणणे आहे त्यामुळे रोजगार निर्मिती होत नाही. सोलापूरच्या सुशिक्षीत तरुणांना नोकरीसाठी बाहेर गावी जावे लागत आहे.पंचवीस वर्षा पूर्वी उद्घाटन होऊन सुरू असलेल्या विमान तळासाठी कित्येक कोटी खर्च करून नूतनीकरण केले. मोदींनी पुन्हा एकदा उद्घाटन केले.उद्घाटन होऊन अनेक महिने झाले तरीही विमानसेवा सुरू करू शकले नाहीत.भ्रष्टाचार आणि स्वतःच्या बगलबच्च्यांना पोसण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. लवकरात लवकर सोलापुरची विमानसेवा सुरू न केल्यास येणाऱ्या दिवसांत सोलापूर विमानतळावर कोणत्याही VIP चे विमान उतरू देणार नाही असा इशारा दिला.
या आंदोलनात शहर अध्यक्ष चेतन नरोटे, संयोजक माजी नगरसेवक विनोद भोसले, महिला अध्यक्षा प्रमिला तुपलवंडे, प्रदेश सरचिटणीस नरसिंह आसादे, वरिष्ठ उपाध्यक्ष सुनील रसाळे, युवक अध्यक्ष गणेश डोंगरे, अल्पसंख्यांक अध्यक्ष जुबेर कुरेशी, सेवादल अध्यक्ष भीमाशंकर टेकाळे, मिडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला, उत्तर युवक अध्यक्ष महेश लोंढे, सिद्धाराम चाकोते, भोजराज पवार,अंबादास गुत्तीकोंडा, अशोक कलशेट्टी,अनिल मस्के,सैफन शेख,राजसाब शेख, विवेक कन्ना,राजेंद्र शिरकुल,सागर उबाळे, संजय गायकवाड, परशुराम सतारेवाले, लखन गायकवाड, सुमन जाधव, रेखा बिनेकर, ज्योती गायकवाड, एजाज बागवान, शिवशंकर अंजनाळकर, सुभाष वाघमारे, संजय कुऱ्हाडे, इलियास शेख, अनिल जाधव,श्रीशैल रणधीरे,अनिल वाघमारे,जीवक इंगळे, सुनील सारंगी,दाऊद नदाफ,धीरज खंदारे,भीमराव शिंदे,नागेश म्हेत्रे,चक्रपाणी गज्जम,गंगाधर शिंदे,आकाश जांभळे,वशिष्ठ सोनकांबळे,मुल्ला सर,शाहू सलगर, मोहसीन फुलारी, दिनेश डोंगरे, चंद्रकांत नाईक, बसू कोळी, रफिक रामपूरे, नागनाथ शावणे,अप्पा सलगर,सचिन पवार, आकाश वाघमारे,चंद्रकांत टिक्के,चंदा काळे, मुमताज तांबोळी, नीता मरोड, सलीमा शेख, अभिलाष अच्युगटला,मार्ता रावडे,दीपक मठ यांच्यासह नागरिक व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

