मंगळवेढा बस स्थानकावर अंदाजे दोन तोळे वजनाची पाटली अज्ञात चोरट्याने केली लंपास
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०६/ २०२५ – दि.02/06/2025 रोजी दुपारी 04/00 वा चे सुमारास मंगळवेढा एसटी बसस्थानक मंगळवेढा ता मंगळवेढा जि सोलापूर येथील मंगळवेढा ते बोराळे जाणाऱ्या एस टी बसमध्ये चढत असताना माझी सोन्याची 1,00,000/-रु किंमतीची सोन्याची अंदाजे दोन तोळा वजनाची एक पाटली ही कोणत्यातरी अज्ञात चोरट्याने माझ्या संमतीवाचुन मुद्दाम लबाडीने चोरुन नेली आहे म्हणुन माझी अज्ञात चोरट्या विरुध्द तक्रार आहे अशी फिर्याद मनिषा पद्माकर बनसोडे वय 34 वर्षे, व्यवसाय- घरकाम,रा बोराळे ता मंगळवेढा यांनी दिली आहे.

मंगळवेढा पोलीस ठाणे गु र नं.460/ 2025 BNS कलम303(2) प्रमाणे नोंद करण्यात आला असून पुढील तपास पो.ना.श्री जाधव करत आहेत.

