Bengaluru stampede आरसीबीने मृतांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये भरपाई जाहीर केली

[ad_1]


Bengaluru stampede: आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबी संघ पहिल्यांदाच बेंगळुरूला पोहोचला तेव्हा तेथे होणाऱ्या विजय परेडसाठी चाहत्यांची गर्दी दिसून आली, ज्यामध्ये चेंगराचेंगरीमुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला. आता आरसीबीने या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर केली आहे.

ALSO READ: हिंदी ही राष्ट्रभाषा नाही, महाराष्ट्रात फक्त मराठी आणि इंग्रजीच शिकवले पाहिजे, अन्यथा…राज ठाकरेंनी दिली धमकी

मिळालेल्या माहितीनुसार इंडियन प्रीमियर लीगच्या १८ व्या हंगामाच्या अंतिम सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने पंजाब किंग्जचा ६ धावांनी पराभव करून पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्यात यश मिळवले. या विजयानंतर आरसीबीचे चाहते खूप आनंदी असताना, बेंगळुरूमध्ये संघाच्या स्वागतासाठी विजय परेडचे आयोजनही करण्यात आले होते. ४ जून रोजी आरसीबी संघ बेंगळुरूला पोहोचला तेव्हा विधान सौधा ते एम. चिन्नास्वामी स्टेडियमपर्यंत विजय परेड काढण्यात येणार होती, ज्यामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त लोक आल्याने चेंगराचेंगरी झाली. अशा परिस्थितीत एकूण ११ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर अनेक जण गंभीर जखमी झाले. या अपघातानंतर, आता आरसीबी फ्रँचायझीने मृतांच्या कुटुंबियांना भरपाई जाहीर केली आहे.

ALSO READ: भंडारा जिल्ह्यात बस आणि टॅक्टरच्या झालेल्या भीषण टक्कर मध्ये चालकाचा दुर्दैवी मृत्यू

आरसीबी बंगळुरू अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना १० लाख रुपये देणार आहे.

 

Edited By- Dhanashri Naik 

ALSO READ: मुंबई सेंट्रल स्टेशनवर ट्रेनमधून उतरतांना प्रवाशाची मान अडकल्याने मृत्यू

[ad_2]

Source link

Leave a Reply

Back To Top