बच्चु कडु यांच्या समर्थनार्थ मंगळवेढ्यात प्रहार व स्वाभिमानी चा रस्ता रोको
मंगळवेढा शहरात दामाजी चौकात प्रहार चे बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ प्रहार संघटना व स्वाभिमानी शेतकरी संघटनेने रस्ता रोको करण्यात आला.
मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज- प्रहार चे संस्थापक माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी , दिव्यांगांना महिना 6000 रुपये मानधन द्यावे, दुधाला 40 रुपये दर द्यावा ,पेरणी ते कापणी यासाठी मदत करावी , मच्छीमार, कामगार यांच्या मागण्या घेऊन अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे त्याचा आज सहावा दिवस आहे त्यांची प्रकृती बिघडत चालली आहे आज तर त्यांना रक्ताची उलटी झाली आहे तरी हे सरकार याकडे दुर्लक्ष करीत आहे त्यामुळे मंगळवेढा येथे मोठ्या प्रमाणात रस्ता रोको करण्यात आला.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवराज घुले, पांडुरंग बाबर,राहुल शेवाळे,किशोर दत्तू तर काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल घुले,मारुती वाकडे व प्रहार संघटनेचे समाधान हेंबाडे ,राकेश पाटील ,रोहिदास कांबळे ,देवदत्त पवार ,युवराज टेकाळे , अमोघसिद्ध काकणकी, आनंद गुंगे,शकील खटिक सतीश जावळे ,सर्जेराव पाराध्ये ,बापु घोडके,पिंटू कोळेकर, संभाजी गोसावी, नागेश मुदगुल, बालाजी भगरे,महिला शहराध्यक्ष रुक्मिणी कोकरे, सविता सुरवसे, जयश्री कोळी ,सुवर्णा पाटील यांच्यासह महिला आणि शेतकरी मनोहर घुले, भगवान खडके,काका पाटील, महेश पुजारी, रावसाहेब बिले, शिवाजी इंगोले व इतर शेतकरी उपस्थित होते .
पोलीस प्रशासनाला यावेळी मोठी अडचण निर्माण झाली होती कारण लग्नसराई असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होऊन लांबलचक रांगा लागल्या होत्या.ट्राफिक जाम झाले होते.यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवराज घुले यांनी बोलताना सांगितले स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांनी स्वतः बच्चू कडू यांच्याजवळ जाऊन शेतकरी संघटनेचा पाठिंबा दर्शवत शेतकऱ्यांच्या मागण्याबाबत बच्चुभाऊंनी मागण्या रास्त आहेत त्यामुळे लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात असे सांगितले.
मंगळावेढा काँग्रेसचे शहराध्यक्ष राहुल घुले यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते ते त्यांनी पाळावे शेतकऱ्यांची चेष्टा करू नये नाहीतर त्यांना याचा परिणाम भोगावे लागतील असा इशारा दिला. प्रहार संघटनेचे समाधान हेंबाडे यांनी मागण्या मान्य कराव्यात असे मनोगत व्यक्त केले.
या रास्तारोको आंदोलनचे निवेदन नायब तहसीलदार शुभांगी जाधव यांनी घेतले.यावेळी मंगळवेढा पोलीस स्टेशन चे वाघमोडे ,पो.काॅ.कृष्णा जाधव,गेजगे व मंगळवेढा मंडलाधिकारी इंगोले उपस्थित होते.