पालघर पोलीस दलाकडुन एकूण १८ गुन्ह्यांतील जप्त अंमली पदार्थाचा करण्यात आला नाश

पालघर पोलीस दलाकडुन एकूण १८ गुन्ह्यांतील जप्त २०४ किलो ७८ ग्रॅम गांजा या अंमली पदार्थाची करण्यात आला नाश

पालघर/ ज्ञानप्रवाह न्यूज –केंद्र शासन अधिसुचना दि. १६/०१/२०१५ कडील तरतुदी नुसार पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई व विशेष पोलीस महानिरीक्षक कोंकण परीक्षेत्र नवी मुंबई यांचे निर्देशानुसार पालघर जिल्हा पोलीस घटकाकडून केलेल्या कारवाईतील जप्त अंमली पदार्थ न्यायालयाचे आदेशानुसार नाश करण्यासाठी पालघर जिल्हा स्तरावर पोलीस अधीक्षक पालघर यांचे अध्यक्षतेखाली अपर पोलीस अधीक्षक, पालघर (सदस्य),पोलीस उप अधीक्षक (गृह) पालघर (सदस्य) व पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर (सदस्य) यांची समिती गठीत करण्यात आलेली आहे.

सदर समितीने राष्ट्रीय स्तरावर दिनांक १६/०९/२०२५ ते दिनांक ३०/०९/२०२५ या कालावधीत अंमली पदार्थ नाश करणे बाबतचे निर्देशानुसार पालघर जिल्हास्तरा वर गठीत समितीचे अध्यक्ष पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर व सदस्य अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर, पोलीस उप अधीक्षक (गृह) रविंद्र नाईक पालघर व पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील स्थानिके गुन्हे शाखा पालघर यांनी बैठक घेवुन पालघर जिल्ह्यात अंमली पदार्थ सदंर्भात दाखल असलेल्या विविध पोलीस ठाण्यांतील दाखल गुन्ह्यांचा आढावा घेवुन, तरतुदीनुसार नाश करणे योग्य अशा १८ गुन्ह्यांची यादी तयार करुन समिती सदस्य यांनी नमुद १८ गुन्ह्यातील जप्त एकुण २०४ किलो ७८ ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ दि.३०/०९/२०२५ रोजी शासकिय पंच, वैद्यमापन विभागाचे प्रतिनिधी, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे प्रतिनिधी आणि रासायनिक न्यायवैज्ञानिक प्रयोगशाळा, कलीना, मुंबई येथील प्रतिनिधी यांचे उपस्थितीत मुंबई वेस्ट मॅनेजमेंट लिमीटेड कंपनी तळोजा, जि. रायगड येथील व्यवस्थापक व स्टाफ यांचेकडे नेवुन त्यांचे मदतीने अमंली पदार्थ गांजा नाश करण्याची कार्यवाही केलेली आहे.

सदरचे जप्त अंमली नाश प्रक्रिया हि नियम व तरतुदीनुसार पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर व पोलीस उपअधीक्षक (मुख्यालय) रविंद्र नाईक, पालघर,पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील स्थानिक गुन्हे शाखा पालघर,श्रे.पोलीस उपनिरीक्षक राजेश वाघ व इतर पोलीस अंमलदार स्थानिक गुन्हे शाखा, व पोलीस मुख्यालयाचे संरक्षण गार्ड यांनी शासकिय पंच,रासायनिक विश्लेषण, महाराष्ट्र प्रदुषण महामंडळाचे अधिकारी, वजनकांटा धारक, फोटोग्राफर यांचेसह पार पाडली आहे.

Leave a Reply

Back To Top