मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाला अ वर्ग:- सभापती सुशील आवताडे

मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीला मिळाला अ वर्ग:- सभापती सुशील आवताडे

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार च्या वतीने शेतकरी व व्यापारी यांचा सन्मान सोहळा संपन्न

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज – कृषी उत्पन्न बाजार समिती मंगळवेढा या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा व सन २०२५ या आर्थिक वर्षाचा आदर्श शेतकरी व आदर्श व्यापारी गौरव सोहळा दि.३० सप्टेंबर २०२५ रोजी संपन्न झाला.

बाजार समितीचे सभापती सुशील आवताडे यांच्या अध्यक्षतेखाली व सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मा.व्हाईस चेअरमन बबनराव आवताडे, श्री संत दामाजी सहकारी साखर कारखाना संचालक सिध्देश्वर आवताडे सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मंगळवेढा विजय वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.

सभेच्या सुरुवातीला संस्थेच्या सर्वसाधारण वार्षिक अहवालाची माहिती सभापती सुशील आवताडे यांनी दिली. यावेळी बाजार समितीमध्ये सर्वाधिक शेतमाल विक्रीस घेऊन येणा-या शेतक-यांना आदर्श शेतकरी तसेच शेतक-यांना उत्कृष्ट सेवा देऊन सर्वाधिक शेतमालाची आवक खरेदी विक्री करणारे आडत व्यापारी यांना आदर्श व्यापारी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

सभापती सुशील आवताडे पुढे बोलताना म्हणाले की बाजार समिती संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा कृषि उत्पन्न बाजार समितीचा अ वर्ग मध्ये समावेश झालेला आहे बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणा-या शेतक-यांची निवासाची व्यवस्था करणेसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन उभारणे यासह विविध विकास कामे करण्याचा मानस संचालक मंडळाचा आहे असे त्यांनी नमुद केले.

सन २०२५ मधील आदर्श शेतकरी पुरस्कार विजेत्यांची नावे:-
अन्नधान्य विभाग– प्रथम क्रमांक बाबासो ज्ञानोबा कांबळे राहणार भाळवणी, द्वितीय क्रमांक किसन नरुटे राहणार तळसंगी, तृतीय क्रमांक नागेश कृष्णा माळी राहणार मंगळवेढा

डाळींब विभाग
प्रथम क्रमांक हणमंत कासाप्पा माळी राहणार लक्ष्मी दहिवडी, द्वितीय क्रमांक सचिन हरिभाऊ माने राहणार चाकोरे तालुका माळशिरस, तृतीय क्रमांक राहुल अशोक कोरे राहणार भोसे.

कांदा विभाग
प्रथम क्रमांक मारुती गंगाधर शेळके राहणार लक्ष्मी दहिवडी, द्वितीय क्रमांक दिनेश बाबुराव पवार कोथाळे तालुका मोहोळ ,तृतीय क्रमांक बालाजी आप्पा गरड मंगळवेढा.

कडबा ( वैरण ) विभाग प्रथम क्रमांक अविनाश तानाजी गांडुळे ,द्वितीय क्रमांक अमर शिवाजी तानगावडे, तृतीय क्रमांक महेश खटकळे.

सन २०२५ मधील आदर्श व्यापारी पुरस्कार विजेत्यांची नावे:-
अन्नधान्य विभाग प्रथम क्रमांक सुरवसे आणि कंपनी सत्यजित राजेंद्र सुरवसे, द्वितीय क्रमांक नकाते आणि कंपनी पांडुरंग सुर्यकांत नकाते ,तृतीय क्रमांक मेसर्स माळी आणि कंपनी रामचंद्र शरण्णाप्पा माळी.

डाळींब विभाग– प्रथम क्रमांक मेसर्स मोहन शंकर माळी, द्वितीय क्रमांक जगदंबा फ्रुट कंपनी विद्या मनोज जाधव, तृतीय क्रमांक राजलक्ष्मी फ्रुट कंपनी मनोज पाटील.

कांदा विभाग -प्रथम क्रमांक बनोसोडे ट्रेडिंग कंपनी नवनाथ राजाराम बनसोडे ,द्वितीय क्रमांक अनिल एकनाथ बोदाडे, तृतीय क्रमांक सरगर ट्रेडिंग कंपनी नामदेव सरगर.

भाजीपाला विभाग – प्रथम क्रमांक वसंत रामचंद्र चेळेकर, सिध्देश्वर लक्ष्मण नागणे ,सचिन भाउ चेळेकर.

बटाटा विभाग – प्रथम क्रमांक बिलाल शेखलाल बागवान, द्वितीय क्रमांक सोमनाथ राजाराम बनसोडे, तृतीय क्रमांक ओंकार विश्वास भोसले.

(कडबा)वैरण विभाग प्रथम क्रमांक संतोष खरात, द्वितीय क्रमांक समाधान खरात, तृतीय क्रमांक किरण जावीर.

अंडी-कोंबडी विभागप्रथम क्रमांक मोहन शंकर माळी, द्वितीय क्रमांक नवाज रमजान मणेरी ,तृतीय क्रमांक ज्ञानेश्वर तुकाराम ननवरे यांचा समावेश आहे. पुरस्कार विजेता शेतकरी व व्यापारी यांना स्मृतीचिन्ह, शाल, सावकार टोपी व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

सदरील कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत दामाजी नगरचे सरपंच जमीर सुतार, बाजार समितीचे उपसभापती नानासो चोपडे, संचालक प्रकाश जुंदळे, बिराप्पा माळी,सहदेव लवटे,गंगाधर काकणकी, जगन्नाथ , ऋतुराज बिले, बसवंत पाटील, प्रविण कोंडुभैरी,सौ.सविता यादव यांच्यासह विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सदस्य ग्रामपंचायत सरपंच व सदस्य शेतकरी व्यापारी हमाल तोलार अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top