१४ वर्षाखालील बालकामगार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई
पंढरपूर /नंदकुमार देशपांडे/ज्ञानप्रवाह न्यूज- दि.१२ जून या जागतिक बालकामगार प्रथा विरोधी दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त यांचे कार्यालय, सोलापूर मार्फत बालकामगार प्रतिबंध करण्याच्या दृष्टिने जिल्हा कृती दलामार्फत सोलापूर जिह्यात कारखान्यांना भेटी देणे,बाल कामगार प्रथाविरोधी सह्यांची मोहीम राबविणे,पोस्टर चिकटविणे, जनजागृती करणे यासाठी दलाची स्थापना करण्यात आली असून त्यांच्या मार्फत आस्थापनांची तपासणी करून बालकामगार आढळून आल्यास त्यांची मुक्तता करणे व बालकामगार अधिनियमांतर्गत कार्यवाही करणे तसेच मालक,चालक यांचेकडून आस्थापनेमध्ये 14 वर्षाखालील बाल कामगार काम करीत नाहीत व भविष्यातही काम ठेवणार नाही असे हमीपत्र संबंधितांकडून घेण्याबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत.

कोणत्याही कारखाना, आस्थापना, हॉटेल, गॅरेज तसेच धोकादायक उद्योग यामध्ये बालकामगार ठेवणे कायद्याने गुन्हा असून अशा ठिकाणी बालकामगार आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल.कोणत्याही कारखाना, आस्थापना, हॉटेल, गॅरेज तसेच धोकादायक उद्योग यामध्ये बालकामगार ठेऊ नये, असे आवाहन सहायक आयुक्त सुधीर गायकवाड यांनी केले आहे.