अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशन द्वारा आषाढी पालखी सोहळ्या निमित्त वारकरी बांधवांना रेनकोट व छत्री वाटप

अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशन द्वारा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी  सोहळ्या निमित्त वारकरी बांधवांना रेनकोट व छत्री वाटप कार्यक्रम संपन्न

पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.22/06/2025 – अनुजा सुशांत पाटील ग्लोबल फाऊंडेशन द्वारा संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज तथा श्री संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्या निमित्ताने आज वारकरी बांधवांना रेनकोट व छत्री वाटप कार्यक्रम पार पडला.

यावेळी वारकरी बंधू भगिनींना ग्लोबल फाऊंडेशनच्यावतीने सुमारे 200 रेनकोट, 200 छत्री,एक हजार बिस्कीट पुडे,10 हजार पाणी बॉटल,5 हजार कप चहा आणि 50 किलो साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.

जे का रंजले गांजले |
त्यांसी म्हणे जो आपुले ||
तोचि साधू ओळखावा |
देव तेथेचि जाणावा ||
श्री जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या वरील अभंगाप्रमाणे ज्यांचे आचरण आहे असे व्यक्तिमत्त्व व आमच्या संस्थेचे आधारस्तंभ,संस्थापक, मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान अनुजा सुशांत पाटील, डॉ. सुशांत पाटील यांच्या संकल्पनेतून या उपक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अनुजा सुशांत पाटील संस्थापक/संचालक,सुशांत पाटील (संचालक) हे होते तर श्रीराम चव्हाण (प्रोजेक्ट डायरेक्टर),रोहन पवार (आर्थिक सल्लागार),संजय भोर, प्रिती मॅडम HR, तुषार ठोंबे,सुमित राणे,आशिष,वेदांत लांजेकर, मदन आडे, सिद्धू जाधव,योगेश महाजन,रणजित शिंदे,प्रियंका पाटील, श्रद्धा पाबळवार,प्रिया जाधव, दिशा टिकास,छाया भेलके,हरिदास खेंगळे,लक्ष्मण रेनपुरे,स्वप्निल देशमुख, लक्ष्मीकांत मापलवार, गुजर वाडीचे सरपंच रोहिदास खोपडे तसेच संस्थेचे सर्व पदाधिकारी,विजय भाऊ,डॉ.गणेश पवार, आशिष जगताप आदी उपस्थित होते.

दि.22/06/2025 रोजी सकाळी : 07:00 वाजता मीरा प्लाझा,मंतरवाडी चौक,श्री हरी साडी डेपो शेजारी,सासवड रोड,फुरसुंगी, पुणे येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.सदर कार्यक्रमासाठी जागेची विनामूल्य उपलब्धता श्री उरळी देवाची चे सरपंच गणेश सुरवसे यांनी करून दिली त्यांचे ग्लोबल फाऊंडेशन च्यावतीने आभार मानण्यात आले.

Leave a Reply

Back To Top