बठाण,ब्रम्हपुरी घरकूल धारकांना 350 ब्रास वाळू महसूल विभागाकडून मोफत वाटप

बठाण,ब्रम्हपुरी घरकूलधारकांना 350 ब्रास वाळू महसूल विभागाकडून मोफत वाटप

मंगळवेढा /प्रतिनिधी- बठाण येथे जप्त केलेल्या वाळू साठ्या मधून ब्रम्हपुरी व बठाण गावातील घरकूलधारकांना मोफत प्रती पाच ब्रास वाळू वाटप करण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

शासनाने गोरगरीब जनतेला घरकुलासाठी मोफत वाळू वाटप करण्याचे धोरण अवलंबले आहे.त्यानुसार प्रभारी तहसिलदार संतोष कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवेढा मंडल अधिकारी धनंजय इंगोले, बठाणचे तलाठी संदिप पवार यांनी बठाण व ब्रम्हपुरी गावातील घरकूलधारकांना 350 ब्रास वाळू वाटप करण्यात आल्याचे महसूल विभागाकडून सांगण्यात आले.

Leave a Reply

Back To Top