नंदेश्वर परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक मुलगी ठार तर अन्य चार जण गंभीर जखमी
मंगळवेढा /प्रतिनिधी : नंदेश्वर-झरेवाडी परिसरात घरगुती गॅसचा स्फोट होवून एक दोन वर्षाची मुलगी ठार झाली तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथे शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.
या घटनेबाबत माहिती अशी की ,बुधवार दि. 25 रोजी दुपारी 2.30 वाजता नंदेश्वर झरेवाडी परिसरात गंगथडे कुटूंबियांचा शिरसी येथे हॉटेल व्यवसाय असून ते शेव बनवत होते.या दरम्यान गॅसची पाईप लिकेज होवून गॅसचा मोठा स्फोट झाला.

यामध्ये दोन वर्षाची श्रेया दादासो गंगथडे हिचा या घटनेत मृत्यू झाला तर दादासो विष्णू गंगथडे,मोनाली दादासो गंगथडे, अनुजा दादासो गंगथडे, स्वरा दादासो गंगथडे,सुनिता राहुल गंगथडे आदी या घटनेत गंभीर जखमी झाले आहेत.त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे वृत्त आहे.
या घटनेची खबर मिळताच मंगळवेढ्याचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे,नंदेश्वर बीटचे पोलीस हवालदार कोष्टी आदींनी सदर घटनास्थळी भेट देवून तपास सुरु केला आहे.

