स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा

आंबवडे ता.भोर / ज्ञानप्रवाह न्यूज – सालाबादप्रमाणे स्वराज्यभूमी प्रतिष्ठान आयोजित सन २०२४ – २५ या शैक्षणिक वर्षातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून शालेयस्तरावर ज्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकवलेले आहेत अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान शनिवार दि.२८ जून, २०२५ रोजी श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे येथे सॉलिसिटर प्रसाद शिंदे,आत्ताच यु पी एस सी परीक्षेत घवघवीत यश संपादन करून भारतीय सैन्यात लेफ्टनंट (class one) पदी विराजमान झालेला नाटंबी गावचा सुपुत्र हर्ष सुरेंद्र घाटे,कोर्ले गावचे उपसरपंच शंकर चिकणे, तानाजीराव चिकणे,गड किल्ले संवर्धन सेल भोर चे उपाध्यक्ष अजित थोपटे व मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांबरोबर त्यांचे पालक आणि शिक्षकही उपस्थित होते.श्री रायरेश्वर विद्यालय टिटेघर,क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके स्मृती विद्यालय रावडी,श्री नागेश्वर विद्यालय आंबवडे,रोहिडेश्वर विद्यालय नाटंबी,वीर कान्होजी जेधे विद्यालय कारी, रायरी माध्यमिक विद्यालय, समर्थ रामदास स्वामी विद्यालय हिरडोशी, आपटी माध्यमिक विद्यालय, पिसावरे माध्यमिक विद्यालय, वीर बाजीप्रभू देशपांडे विद्यालय शिंद, सरनोबत सिदोजी थोपटे विद्यालय, खानापूर, आंबवडे आणि पालसिद्धेश्वर विद्यालय वरवडी-पाले इ विद्यालयातील गुणवंतांना आमंत्रित करून संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आला.

यावेळी सॉलिसीटर प्रसाद शिंदे आणि हर्ष घाटे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी विद्यार्थी व मान्यवरांसमवेत पालक आणि स्वराज्यभूमी प्रतिष्ठानचे शिवपाईक कार्यक्रमास उपस्थित होते.

स्वराज्यभूमी प्रतिष्ठान गडकिल्ले – समाधी- विरघळी संवर्धन व जतन यासोबतच कला, क्रीडा, शिक्षण,आरोग्य क्षेत्रात गेली अनेक वर्षे सातत्याने सामाजिक कार्य करत आहे.

Leave a Reply

Back To Top