शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंढरपूर उपतालुकाप्रमुख पदी अनिल जाधव यांची निवड जाहीर
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि २८ – शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पंढरपूर तालुका उपप्रमुख पदावर उंबरे येथील कट्टर निष्ठावान शिवसैनिक अनिल जाधव यांची निवड आज जाहीर करण्यात आली असून माजी केंद्रिय मंञी शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते त्यांना आज निवड पञ देण्यात आले.

शुक्रवार दि.२७ रोजी पंढरपूर येथील योग भवन येथे झालेल्या आढावा बैठकीत अनिल जाधव यांची निवड करण्यात आली.यावेळी महाराष्ट्र संघटक उध्दव कदम,आमदार सुनील शिंदे,शिवसेना उपनेते शरद कोळी, जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ,जिल्हा प्रमुख अजय दासरी, पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे,उपजिल्हाप्रमुख जयवंत माने, उपजिल्हा प्रमुख काकासाहेब बुराडे , सांगोला उपजिल्हाप्रमुख सुर्यकांत घाडगे, तालुकाप्रमुख बंडू घोडके,शहरप्रमुख युवराज गोमेवाडीकर ,शहर समन्वयक लंकेश बुराडे, जेष्ठ शिवसैनिक बाळासाहेब रणदिवे,शाम सुरवसे, उपतालुकाप्रमुख नागेश रितुंड, प्रविण शिंदे , संजय घोडके, उपशहरप्रमुख प्रणीत पवार,इश्वर साळूंखे,गजानन टल्लू सह बहुसंख्य शिवसैनिक उपस्थित होते .

अनिल जाधव यांची निवड जाहीर होताच करकंब, उंबरे ,पेहे आदी ठिकाणच्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या निवडीचे पेढे वाटून व फटाक्यांची आतिषबाजी करत स्वागत केले.