दिवाळीचा गोडवा : Diwali कौठाळी येथे डीएसपी ग्रुपतर्फे मोफत साखर वाटप

दिवाळीचा गोडवा : कौठाळी येथे डीएसपी ग्रुपतर्फे मोफत साखर वाटप

कौठाळी ता.पंढरपूर,जि.सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज – दिवाळी सणाच्या निमित्ताने ग्रामस्थांच्या आनंदात गोडवा आणण्यासाठी डी.एस.पाटील (डीएसपी ग्रुप, कौठाळी) यांच्या वतीने मोफत साखर वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमामुळे गावात उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

गावात आनंदाचा गोडवा

दिवाळी सणानिमित्त गोरगरीब आणि वंचित ग्रामस्थांना प्रत्येकी ५ किलो साखर भेट म्हणून देण्यात आली. या उपक्रमातून एकूण ११ क्विंटल साखरेचे वितरण करण्यात आले. डीएसपी ग्रुपच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे गावकऱ्यांनी मनापासून कौतुक केले.

कार्यक्रम उत्साहात पार पडला

साखरवाटपाचा कार्यक्रम डीएसपी प्राईड, कौठाळी येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी ग्रामपंचायत सदस्य प्रकाश दादा पाटील हे होते. गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या उपक्रमाचे स्वागत केले.

ग्रामस्थांचा भरभरून प्रतिसाद

ग्रामस्थांनी आयोजकांविषयी कृतज्ञता व्यक्त करत ॲड. दत्तात्रय सुखदेव पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे आभार मानले. दिवाळीच्या सणात गोडवा आणणारा हा उपक्रम गावभर चर्चेचा विषय ठरला आहे.

कार्यक्रमाच्या यशात सहकार्य करणारे

या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी युवक नेते अशोक नागटिळक, बांधकाम व्यावसायिक पांडुरंग नागटिळक, मा. सरपंच किशोर लोखंडे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ लोखंडे, मा. उपसरपंच नामदेव लेंडवे यांसह सिताराम पाटील, शिवाजी सप्ताळ, अनंता पाटील, श्रीकांत नागटिळक, हनुमंत पाटील, नितीन नागटिळक, शांतू नागटिळक, सतीश पाटील, संजय नागटिळक, कैलास लोखंडे, सिद्धेश्वर इंगोले, हरी सलमपुरे,दशरथ काळेल, विनायक अटकळे, अमोल नागटिळक, चांद इनामदार आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top