चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात संपन्न
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि. 01/07 /2025 – दागिन्यांच्या विश्वामध्ये सोनेरी ठसा उमटवणारी बारामतीची सुवर्णपेढी चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेमध्ये राष्ट्रीय डॉक्टर्स डे मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाला पंढरपूर शहरातील तज्ञ डॉक्टरांनी हजेरी लावली यामध्ये डॉ.राजेश फडे, डॉ.अनुप फडे, डॉ. संदेश फडे ,डॉ. तृप्ती फडे ,डॉ.सुनीता कारंडे डॉ.आशिष चव्हाण, डॉ.सौरभ सोनवणे, डॉ.पियुष बागल,डॉ. तुषार खंडागळे, डॉ. अनुराधा खंडागळे, डॉ.श्रुती सोनवणे, डॉ. भावना पाचकवडे, डॉ. मृदुला शेवाळे, डॉ.रसिका कुलकर्णी आदी डॉक्टरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

या कार्यक्रमात डॉ.सुनिता कारंडे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले व शाखेचे मॅनेजर बंडू गोफणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचा शेवट पाहुण्यांच्या सन्मानाने व आभार प्रदर्शनाने झाला.या कार्यक्रमाला पंढरपूर शाखेचे मॅनेजर दिपक चव्हाण, अनिल वठारे सर,बंडू गोफणे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मार्केटिंग विभागाचे रणजीत सावळे यांनी केले.या कार्यक्रमाचे व्यवस्थापन राजकुमार नगरे यांच्यासह व सर्व स्टाफ यांनी केले.