मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी डॉक्टर , सीए आणि शेतकरी बांधव समाजाप्रती देत असलेल्या अमूल्य अशा सेवेबद्दल आभार केले व्यक्त
डॉक्टर्स डे,सनदी लेखापाल दिन आणि शेतकरी दिना निमित्त पंढरपूर बँकेमध्ये स्नेह मेळावा

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०१/०७/२०२५ – आपल्या सेवेने समाजाचे आरोग्य सुदृढ करणाऱ्या, रुग्णांना जीवनदान देणाऱ्या,देवदूतासारख्या डॉक्टरांचा डॉक्टर्स डे doctors day निमित्त तसेच आपल्या तल्लख बुद्धीने, निष्ठेने, व आर्थिक प्रामाणिकपणे देशाच्या आर्थिक घडामोडींना दिशा देणाऱ्या सी.ए.बंधूंचा CA day सनदी लेखापाल दिन आणि शेतकरी दिनाचे Farmers day निमित्त डॉक्टर्स व सी.ए. आणि शेतकरी बांधव यांचा स्नेह मेळावा मंगळवार दि.०१ जुलै २०२५ रोजी सायं. ५.३० वा. कर्मयोगी सभागृह खवा बाजार शाखा नवी पेठ पंढरपूर येथे संपन्न झाला.

मा.विधानपरिषद सदस्य तथा पंढरपूर बँकेचे कुटूंब प्रमुख प्रशांत परिचारक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यक्रमात डॉक्टर्स असोसिएशनच्या आय एमए, होमिओपॅथिक आणि निमा,डेंन्टल च्या अध्यक्षांच्या व चार्टर्ड अकौटंट असोसिएशन च्या पदाधिकार्यांच्या आणि शेतकरी श्री देठे,तानाजी वाघमोडे पाटील यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने सुरुवात झाली.

बॅंकेचे चेअरमन सतीश मुळे,व्हाईस चेअरमन सौ.माधुरी जोशी, मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे आणि पंढरपूर बँकेचे सर्व संचालक मंडळ,सेवक वर्ग व पंढरपूर बँक परिवार उपस्थित होते.

यावेळी बोलताना मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी डॉक्टर , सीए आणि शेतकरी बांधव समाजाप्रती देत असलेल्या अमूल्य अशा सेवेबद्दल गौरवोद्गार काढून आभार व्यक्त करत या सर्वांना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.पंढरपूर अर्बन को-ऑप.बँक लि.,पंढरपूरची स्थापना दि.१९ नोव्हेंबर १९१२ साली झाली तेव्हापासून आजतागायत सर्व ग्राहकांचा विश्वास संपादन करुन त्यांच्याशी अतूट नाते निर्माण केल्याचे सांगितले. वैद्यकिय सेवा देताना येणार्या अडचणीप्रसंगी आपण डॉक्टरांच्या पाठिशी खंबीरपणे उभे रहावू अशी ग्वाहीही मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी दिली.

बॅंकेचे चेअरमन सतीश मुळे यांनीही मनोगतात डॉक्टर ,सीए आणि शेतकरी बांधवांना दिनाच्या शुभेच्छा दिल्या.बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश विरधे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
डॉक्टरांच्यावतीने डॉ साळुंखे,डॉ.अमित आसबे,डॉ.धोत्रे, डॉ. ऋतुजा उत्पात,डॉ.मिलींद जोशी,डॉ.संगिता पाटील यांनी तर सीए च्यावतीने जेष्ठ सीए संजीव कोठाडिया,पवन झंवर यांनी मनोगत व्यक्त केले.

या कार्यक्रमासाठी डॉक्टर ,सीए आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी पंढरपूर बँकेचे सर्व संचालक मंडळ,सेवक वर्ग व पंढरपूर बँक परिवार यांनी प्रयत्न केले.

पंढरपूर बँक परिवाराने आयोजित केलेल्या या डॉक्टर्स ,सीए आणि शेतकरी दिनाच्या कार्यक्रमाबद्दल सर्व असोसिएशनच्या वतीने समाधान व्यक्त करत असेच कार्यक्रम राबवावेत अशी अपेक्षा करत आयोजनाबद्दल आभार मानले.
