मंगळवेढा तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणा साठी मंगळवारी सोडत

मंगळवेढा तालुक्यातील सरपंचपदाच्या आरक्षणासाठी मंगळवारी सोडत

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह : मंगळवेढा तालुक्यातील 79 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत मंगळवार दि.15 जुलै रोजी काढण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी दिली.

सदरचे आरक्षण यापूर्वी दि. 22 एप्रिल रोजी काढण्यात आले होते परंतु जिल्हाधिकारी सोलापूर यांनी दि.08/07/2025 रोजी नव्याने दिलेल्या आरक्षण कार्यक्रमानुसार आता पुन्हा आरक्षण काढले जाणार आहे.

मंगळवेढा तालुक्यातील एकूण 79 ग्रामपंचायतीच्या सन 2025 ते 2030 मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित करण्यात येणार असून ही सोडत मंगळवार दि.15 रोजी दुपारी 12 वाजता तहसील कार्यालयात काढण्यात येणार आहे.

या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण अशा प्रवर्गामध्ये सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केले जाणार आहे. तसेच याचवेळी महिला सरपंच पदाचे सुद्धा आरक्षण शासकीय नियमानुसार व सोडतीद्वारे निश्चित केले जाणार आहे.

सदरची आरक्षण सोडत उपविभागीय अधिकारी बी.आर. माळी यांच्या नियंत्रणा खाली व तहसीलदार मदन जाधव यांच्या उपस्थितीत पार पाडली जाणार आहे. तरी आरक्षण सोडतीवेळी मंगळवेढा तालुक्या तील लोकप्रतिनिधी व नागरिकांनी उपस्थित रहावे,असे आवाहन तहसीलदार मदन जाधव यांनी केले आहे.

Leave a Reply

Back To Top