गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ एमआयटी ज्युनियर कॉलेज वाखरी पंढरपूर येथे संपन्न
विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेचा अभ्यासक्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे योगदान महत्त्वाचे

वाखरी,पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – एमआयटी ज्युनियर कॉलेज वाखरी ता.पंढरपूर येथे नुकताच गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला.प्राचार्य डॉ.स्वप्नील शेठ व हेड मिस्ट्रेस सौ.शिबानी बॅनर्जी मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला सर्व गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते.

कार्यक्रमात २०२४-२५ शैक्षणिक वर्षात उत्तम यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.ऋषित पंडेलवाल,पार्थ पंपिटावर,सोहम डुबल,पार्थ कोठारी,प्रतीक्षा देशमुख व सानिका पाटील या विद्यार्थ्यांना विशेष सन्मान देण्यात आला.

सत्कारप्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपली मनोगते व्यक्त केली. विद्यार्थ्यांच्या यशामागे शाळेचा अभ्यासक्रम, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे योगदान किती महत्त्वाचे असते, हे त्यांनी आपल्या भाषणातून अधोरेखित केले.

कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत प्रेरणादायी आणि उत्साहवर्धक ठरले.विद्यार्थ्यांमध्ये पुढील वाटचालीसाठी आत्मविश्वास व प्रेरणा निर्माण करणारा हा सोहळा सर्वांच्या स्मरणात राहणारा ठरला.

