शिवसेना महिला शाखाप्रमुखाला मारहाण, उपसभापती नीलम गोऱ्हेंकडून घटनेची दखल
मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१०/०८/२०२५ : वरळीतील शिवसेना शाखा क्र.१९८ च्या महिला शाखाप्रमुख पूजा बरिया यांना काल ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की आणि मारहाणीची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी पूजा बरिया यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून त्यांची विचारपूस केली.
पूजा बरिया यांनी डॉ.नीलम गोऱ्हे यांना सांगितले की,आम्हाला चिथावणी देऊन आमच्याकडून हात उचलावा असा त्यांचा प्रयत्न होता.

त्यावर गोऱ्हे यांनी पूजाला धीर देत आम्ही सर्वजण तुझ्यासोबत आहोत,असे सांगितले.
विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभव आणि आगामी मुंबई महानगरपालिकेतील पराभवाच्या भीतीने ठाकरे गटात नैराश्य पसरले आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे,असे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे. यासोबतच त्यांनी पूजाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले.
तसेच ठाकरे गटाने महिलांशी केलेल्या या गैरवर्तनाने महिलांचा अपमान केला आहे, असेही डॉ.नीलम गोऱ्हे यांनी नमूद केले.


