राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना एकीकरण समितीच्या कामबंद आंदोलनाला मनसेचा पाठिंबा
मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी उपस्थित राहत पाठिंबा देत केले कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन

पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज – राष्ट्रीय आरोग्य अभियान कंत्राटी अधिकारी व कर्मचारी संघटना एकीकरण समिती महाराष्ट्र यांचे सोलापूर शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कामबंद आंदोलन सुरू आहे.

या कामबंद आंदोलनला मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी उपस्थित राहून पाठिंबा देऊन सर्व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, प्रशांत गिड्डे,सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे,विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिषेक रमपुरे,गोविंद बंदपट्टे, मनसेचे पंढरपूर शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष महादेव मांढरे, संघटनेचे राम गोगाव आदी उपस्थित होते.


