न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग प्रशालेत पर्यावरण स्नेही गणेशोत्सव


पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज – पुणे येथील डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग प्रशालेत शाळेच्या पर्यावरण विभागाच्यावतीने पर्यावरण स्नेही गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे.

पॉलिथिन मुक्त शाडूच्या मातीचे पुनर्चक्रीकरण अन डिस्पोजेबल वेस्टला नाही म्हणायला शिका आणि निर्माल्या पासून खत निर्मितीसाठी 2200 विद्यार्थ्यानी सहभाग नोंदविला.यात


पॉलिथिन मुक्त गणेशोत्सव :
पॉलिथिन कॅरीबॅगचा वापर १००% टाळायचा.कापडी पिशवीचा पर्याय मंडळामध्ये आणि सोसायटीमध्ये उपलब्ध करून द्यायचा.
शाडू मातीचे पुनर्भरण :
पुनरावर्तन या उपक्रमाअंतर्गत बाप्पाच्या मुर्तीचे विसर्जन केल्यावर जमा होणारी शाडू माती परत मूर्ती निर्माण करणाऱ्यांपर्यंत पोहचवायची.
निर्माल्यापासून खत निर्मिती :
पर्यावरण संरक्षणासाठी बाप्पांना वाहिलेल्या फुलांचा कचरा न करता व ती नदीत टाकून नदी दूषित न करता त्याचे खत करून झाडांना घालायचे.

डिस्पोजेबल वापरण्यास ‘नाही म्हणा’:
वापरा आणि फेकून द्या स्वरूपाच्या कागदी प्लेट्स, ग्लास, चमचे इत्यादीचा वापर बिलकुल न करता त्याऐवजी स्टील प्लेप्ट्स, चमचे,पेले याची बॅंक तयार करणे आणि त्याचे सामुहिक नियोजन करणे.
प्रशालेचे पर्यावरण प्रमुख हेमंत पाठक यांनी प्रशालेच्या शाळा प्रमुख सौ अनिता भोसले उपमुख्याध्यापक जयंत टोले, पर्यवेक्षिका सौ.अंजली गोरे,सौ.मंजुषा शेलूकर,श्रीमती प्रतिभा वडनेरकर सौ.मोरे,सौ.शेळके,सौ. ढोण,सौ.सोरटे, श्री.रोकडे, सौ.दराडे सौ.कवडे आणि पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी अभिजित दोडके +91 99756 56316 यांच्याशी संपर्क साधावा.

