तु चायनीस का उघडले या कारणावरुन अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी चौघांविरुध्द गुन्हा दाखल
Mangalwedha crime news: मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज: मंगळवेढा तालुक्यातील ग्रामीण भागात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस तु चायनीस का उघडले आहे ? ही जागा आमची आहे असे म्हणत तिला अश्लिल शिवीगाळी करुन तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केल्याप्रकरणी निर्मला स्वामी,दिलीप स्वामी,शोभा स्वामी,कैलास स्वामी सर्व रा.भोसे या चौघा विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती प्रमाणे यातील पिडीत मुलगी दि.५ रोजी सकाळी १०.०० वाजता ती तिच्या आत्यासह भोसे येथे चायनीस सेंटर या ठिकाणी गेले असता वरील आरोपींनी तेथे येवून तु चायनीस का उघडले आहे ? ही आमची जागा आहे असे म्हणून त्या पिडीत मुलीला जवळ ओढून टी शर्ट फाडला व तिच्या अंगाशी झोंबाझोंबी करुन अश्लिल शिवीगाळी करत तिच्या मनाला लज्जा वाटेल असे कृत्य केले.
दरम्यान पिडीतीची आत्या हिलाही आरोपींनी हाताने मारहाण केल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद लातुरकर हे करीत आहेत.





