समाजाचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे ते आम्ही परोपरीने पाळत आहे – पोलिस निरीक्षक अरुण पवार

पोलीस बंधुंना राखी बांधुन लायन्स संस्थेंच्या वतीने साजरा करण्यात आला रक्षाबंधन We are doing our duty to protect the society – Inspector of Police Arun Pawar

   पंढरपूर - लायन्स क्लब ऑफ पंढरपूरच्या वतीने पंढरपूर शहर पोलिस स्टेशनमध्ये रक्षाबंधन सण साजरा करण्यात आला. सर्व महिलांचे रक्षण करणाऱ्या पोलीस भाऊरायाचे औक्षण करून राखीचे पवित्र बंधन बांधण्यात आले.
पर्यावरणपूरक राखीं स्पर्धा उत्साहात संपन्न
      कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाहेर पडून सण साजरे करणे मुश्किल झाले आहे. रक्षाबंधनाच्या अगोदरच्या दिवशी राखी मेकींग स्पर्धा ठेवली होती. सदर स्पर्धा ऑनलाईन आणि ऑफलाईन पध्दतीने घेण्यात आली. या स्पर्धेमुळे कलेला वाव मिळाला आणि कलेची दखलही घेतली गेली. स्वतः तयार केलेली राखी भावाच्या हातावर बांधायला मिळणार होती तसेच पर्यावरण पूरक राखी बनवायला सांगून प्रदूषण टाळणे व उपयुक्त वस्तूंचे रिसायकलिंग करणे अशा अतिशय कलात्मक पद्धतीने स्पर्धकांनी इको फ्रेंडली राख्या बनवल्या होत्या.

 त्यानंतर पंढरपूर शहर पोलीस स्टेशनमधे रक्षा बंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला.

  या प्रसंगी बोलताना लायन्स क्लब पंढरपूरच्या सेक्रेटरी ललिता कोळवले म्हणाल्या की अतिशय खडतर आयुष्य असलेल्या, अहोरात्र जनतेची सेवा करणाऱ्या, कुटुंबासाठीही पुरेसा वेळ देऊ न शकणाऱ्या कोरोना आणि नैसर्गिक आपत्तीमधे जीवाची पर्वा न करता रक्षण करणाऱ्या पोलीस भावास राखी बांधणे हे आमचे नैतिक कर्तव्य आहे तसेच आमच्या पोलीस भगिनी या सुद्धा परोपरीने समाजाच्या रक्षणासाठी कार्यरत आहेत त्यांना सुद्धा कृतज्ञता म्हणून राखीचे पवित्र बंधन बांधणे आमचे कर्तव्य आहे .  

   वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण पवार म्हणाले की, समाजाचे रक्षण करणे आमचे कर्तव्य आहे ते आम्ही परोपरीने पाळत आलो आहे.आमच्या विषयी आस्था बाळगून आलेल्या भगिनींना मी धन्यवाद देतो व लायन्स भगिनींनी इथंपर्यंत येऊन आम्हाला सणाचा आनंद साजरा करून दिला याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त करतो. 

     याप्रसंगी पोलीस निरीक्षक,उपनिरीक्षक , पोलीस कॉन्स्टेबल,निर्भया पथकातील सर्व सदस्य, तसेच कार्यालयीन कर्मचारी उपस्थित होते . 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेखा कुलकर्णी यांनी केले. आभार माधुरी जाधव यांनी मानले.याप्रसंगी सौ.सुनिता परदेशी,सरिता गुप्ता ,शोभा गुप्ता, सीमा गुप्ता, माधुरी जाधव ,डॉ पल्लवी माने,सिमा अधटराव आदि उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: