पंढरपुरातील मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामांस सुरूवात – शहीद टिपू सुलतान युवक संघटना मागणीस यश

पंढरपुरातील मुस्लिम समाजाच्या प्रलंबित विकास कामांस सुरूवात – शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या मागणीस यश

मुस्लिम बांधवांना जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी केले आवाहन

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज-अल्पसंख्यांक बहुल क्षेत्र विकास योजने अंतर्गत 12 लाख 62 हजार रूपयांच्या निधीतून पंढरपुरातील बडा कब्रस्थान व गोपाळपूर येथील लिंगायत स्मशानभूमी शेजारील कब्रस्थानातील 9 लाख रूपयांच्या विकास कामांस सुरूवात करण्यात आलेली आहे. याचे उद्‌घाटन शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांच्या हस्ते करण्यात आले.या उद्‌घाटनावेळी जिल्हा उपाध्यक्ष मुबारक आतार,शहराध्यक्ष आदम बागवान,पत्रकार रफीक आतार,मिन जानीब कमिटीचे अध्यक्ष शफी मुलाणी व इतर मुस्लिम समाजातील बांधव उपस्थित होते.

गेल्या 6 वर्षांपासून शहीद टिपू सुलतान युवक संघटनेच्या माध्यमातून मुस्लिम समाजातील धार्मिक स्थळातील प्रलंबित प्रश्नांसाठी आंदोलन, उपोषण करून पाठपुरावा करत पंढरपूर नगरपरिषदेचे व प्रशासनाचे लक्ष्य वेधून घेतले होते.त्यानंतर बडा कब्रस्थान येथे 5 लाख व छोटा कब्रस्थान येथे 5 लाख असे पंढरपूर – मंगळवेढ्याचे आमदार समाधान आवताडे यांच्या फंडातून एकूण 10 लाख रूपयांचे काम केले. छोटा कब्रस्थान येथे हायस्मास्ट दिवा व गेट बसविण्यात आले.बडा कब्रस्थान येथे हायमास्ट दिवा बसविण्यात आला असून सध्या बडा कब्रस्थान येथे अंत्यविधीचे सामान ठेवण्यासाठी 12 लाख 62 हजार रूपयांच्या अल्पसंख्यांक निधीतून आर सी सी खोली बांधण्याचे सुरू आहे.

या ठिकाणी मनसे नेते दिलीप धोत्रे यांनी स्वखर्चातून कॉंक्रीटीकरण केले आहे. पंढरपूर नगरपरिषद शाळा क्र.16 व 17 या ठिकाणी पायाभूत सुविधा योजनेतून छत दुरूस्तीसाठी 2 + 2 असे 4 लाख रूपयांचे शासनाच्या निधीतून काम झालेले आहे.

पंढरपूर शहरातील सांगोला रोड येथील छोटा कब्रस्थानची 10 गुंठे जागा रस्ता रूंदीकरणात जाणार म्हणून मुस्लिम समाजा च्यावतीने त्याबाबत नगरपरिषदे विरोधात पंढरपूर न्यायालयात दावा दाखल करण्यात आला होता.त्यानंतर त्या बदल्यात नगर परिषदेकडून गोपाळपूर रोड येथे 33 गुंठे व शेगाव दुमाला हद्दीत 55 गुंठे जागा देण्यात यावी असा आदेश कोर्टाकडून देण्यात आला. त्यानंतर गोपाळपूर रोड येथे 33 गुंठे देण्यात आले.पण 55 गुंठ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे सदरची जागा ताब्यात देवून त्या ठिकाणी संरक्षण वॉलकंपाऊंड, हायमास्ट दिवा, कॉंक्रीटीकरण करून सुरक्षा रक्षक देण्याबाबत जिल्हाधिकारी सोलापूर व पंढरपूर नगरपरिषद प्रशासक तथा प्रांत यांना निवेदन देवून पाठपुरावा सुरू आहे.

पंढरपूर शहरातील मुस्लिम समाजाच्या धार्मिक स्थळांना निधी देण्यासाठी व समाजातील मतभेद मिटविण्यासाठी वक्फ बोर्डचे मा.चेअरमन वजाहत मिर्झा यांना निवेदन देवून शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी पंढरपूर शहरात यावे अशी मागणी केली आहे.

शासनाच्या जीआरनुसार मुर्शदबाबा दरगाह व बडा कब्रस्थान या ठिकाणच्या 7/12 उताऱ्यावरील ट्रस्टीचे नावे कमी केलेली आहेत तरी मुस्लिम समाजातील तांबोळी, आतार, शेख, बागवान, खाटीक व इतर सर्व जमातीच्या प्रमुख व्यक्ती यांची एक कमिटी स्थापन करून बडा कब्रस्थान,मुर्शदबाबा दरगाह व 55 गुंठे क्षेत्रासाठी नवीन ट्रस्ट नेमण्यासाठी समाजातील सर्वांची मिटींग घेण्यात यावी जेणेकरून त्या ठिकाणची विकास कामे करता येतील समाजातील एकमेकांशी आपसात मतभेद न करता समाजाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे तसेच शासन वारंवार निधी देवू शकत नाही त्यामुळे निधीअभावी कामे बंद पडू नये याकरिता कब्रस्थानसाठी मुस्लिम समाजा तील सर्व जमातीच्या प्रमुख लोकांनी आपआपल्या समाजबांधवांच्या पावत्या फाडून निधी गोळा करून कब्रस्थानसाठी खर्च करण्यात यावा व शिल्लक निधी बॅंकेच्या खात्यावर ठेवावा जेणेकरून पुन्हा विकासकामांसाठी निधी कमी पडणार नाही तरी निधी गोळा करावा व आहे त्या छोटा, बडा कब्रस्थानातील मयत पुरण्यासाठी जागा अपुरी पडत असल्याने नवीन कब्रस्थान उभारण्यासाठी नवीन जागा घेण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे.मुर्शदबाबा दरगाह व बडा कब्रस्थान या जागेवर सर्व मुस्लिम बांधव यांचा अधिकार असताना व वक्फ बोर्ड यांचे नियंत्रणाखाली असताना सर्व जमातीचे लोकांची मिटींग घेवून त्यांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतल्याशिवाय मुस्लिम समाजातील काही व्यक्तीनी चेंजींग रिपोर्ट सादर करू नये असे आवाहन शहीद टिपू सुलतान युवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जमीर तांबोळी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *