श्री गणेश रुग्णसेवा मित्र मंडळ पंढरपूर संचलित निवासी मूकबधिर व मतिमंद विद्यालयामधील दिव्यांग विद्यार्थ्यांनी शहरात लेझीम पथकासह मिरवणूक काढून केले श्री गणेशाचे विसर्जन
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.: ०४ सप्टेंबर २०२५ – पंढरपूर येथील श्री गणेश रुग्णसेवा मित्र मंडळ पंढरपूर संचलित निवासी मूकबधिर व मतिमंद विद्यालय पंढरपूरमध्ये गेली ३५ वर्ष अविरतपणे चालत आलेला श्री गणेश प्रतिष्ठपना सोहळा याही वर्षी श्री गणेश रुग्णसेवा मित्र मंडळ पंढरपूर संचलित निवासी मूकबधिर व मतिमंद विद्यालय पंढरपूर मध्ये उत्साहात साजरा करण्यात आला.दिव्यांग विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी पंढरपूर शहरात लेझीम पथकासह मिरवणूक काढून केले श्री गणेशाचे विसर्जन महाद्वार घाटावर केले.
चालू वर्षी संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार प्रशांत परिचारक व चेअरमन राजीव पां.कटेकर यांच्या संकल्पनेतून पंढरपूर शहरातून लेझीम पथकासह मिरवणूक काढण्याचा मानस होता.त्यानुसार बुधवार दि.०३ सप्टेंबर २०२५ रोजी शिवाजी चौक ते सहकार चौक या मार्गे प्रत्येक चौकात लेझीम व उपदेशपर मूक नाट्य सादरीकरण करून महाद्वार घाटावर श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

सदर श्री गणेश विसर्जन मिरवणूक समारंभासाठी संस्थेचे अध्यक्ष मा.आमदार प्रशांत परिचारक यांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कौतुक केले .
या कार्यक्रमाकरिता संस्थेचे चेअरमन राजीव कटेकर,मूकबधिर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती बडवे व मतीमंद विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कवडे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले .

