पाक पुरस्कृत दहशतवाद सुरु असतानाच मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा शिवसेना ठाकरे गटाकडून आरोप

पंढरपुरात भारत-पाक क्रिकेट सामन्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाकडून जोरदार घोषणाबाजी

पाक पुरस्कृत दहशतवाद सुरु असतानाच मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप

माझा देश माझं कुंकू या अभियानातून मोदी सरकारला कुंकू पाठविण्याचा निर्धार

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१५/०९/२०२५- भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना राज्यभरात आक्रमक झाली आहे. राज्यभरात ठिकठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आंदोलन केलं जातंय.काल उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत आक्रमक भूमिका मांडली होती.त्यानंतर आता ठिकठिकाणी ठाकरेंच्या सेनेकडून आंदोलन केलं गेले.

पंढरपुरातही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे एकत्र येत भारत पाक क्रिकेट सामना होणार असताना मोदी सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याने निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या.तर पहलगाम इथल्या दहशतवादी हल्ल्याच्या जखमा भरल्या नसताना आणि शहीद जवानांचे रक्त सुकलेले नसताना पाकिस्तानशी क्रिकेट सामने कसे असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला असून या सामन्याला शिवसेनेचा विरोध असून ‘माझं कुंकू, माझा देश’ हे आंदोलन केलं गेलं.

यावेळी बोलताना शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे म्हणाले,22 एप्रिल रोजी काश्मीरच्या पहलगाम येथे अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटक मारले गेले.अनेक माता भगिनींचे कुंकू पुसले गेले. ज्या कुटुंबातील बळी गेले आहेत त्यांची दुःख दुर्लक्षित करून भारतीयांच्या मनात पाकिस्तान बद्दल असलेला प्रचंड संताप याकडे केवळ हेतूने दुर्लक्ष करीत भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट मॅच च्या आयोजन करण्यात आले आहे. दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानचे पाणी बंद करू अशी वल्गना करणारे पंतप्रधान मोदी भारत युद्ध जिंकत आलेला असताना युद्ध थांबवतात.बदला घेणे अजून बाकी असताना क्रिकेट खेळणे सुरू केले आहे. ज्या महिलांनी आपला पति गमावला त्यांचा हा मोठा अपमान आहे. लोकभावना म्हणून माझा देश माझं कुंकू या अभियानातून मोदी सरकारला कुंकू पाठवणार असल्याचे सांगण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख काकासो बुराडे,उपजिल्हा प्रमुख जयवंत माने,पंढरपूर तालुका प्रमुख बंडू घोडके,शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर, उपतालुका प्रमुख उत्तम कराळे,संजय घोडके,नागेश रितुण्ड, शेतकरी सेनेचे शिवाजी जाधव,रणजित बागल, उपशहर प्रमुख प्रशांत पवार,नितीन थिटे, प्रशांत जाधव,सोमनाथ अनपट,दादासो मोरे,अंकुश साळूंखे,भारत पोरे,समाधान गोरे,युवा उपअधिकारी समाधान जगदाळे, जीवन चव्हाण, गौसफाक,शिव आरोग्य सेनेचे समाधान गिड्डे,अर्जुन भोसले, तालुका सम्वनयक कृष्णदीप लवटे,बंडू सुरवसे, जालिंदर शिंदे,उमेश साळूंखे,बाळासाहेब पवार, नामदेव चव्हाण,भारत कदम,विलास चव्हाण,अनिल पवार, महेश यादव,विजय जाधव,उपशहर प्रमुख अविनाश खुळपे, दत्तात्रय पाटील, अमोल पवार,अक्षय शेंबडे, शंकर हिंगमिरे, विशाल कांबळे, अजय वाघमारे,कल्याण कदम, शिवाजी राऊत, स्वप्नील कदम,कैलास शिंदे,मनोज शिंदे, एकनाथ कोरपडे, नवनाथ सुरवसे,पिंटू घोडके,निपुण काळे,राहुल काळे,बापू कदम, नवनाथ चव्हाण,गजानन टल्लू, निखिल चव्हाण आदी उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उद्धव बाळसाहेब ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकारी व शिवसैनिक संगीता पवार,रुपाली पवार,मंजुळा दोडमिसे,अनिता आसबे,रेहाना आतार, विमल टिंगरे,बायडा सर्जे,अनिता जाधव, कविता पवार,तेजस्विनी नायकुडे,अविंदा कोळी,सरस्वती गोसावी,संगीता कोळी, मोनाली लोहार,रेशमा चांदणे,भामाबाई देवकर,सना वाघमारे,ललिता सावंत यांच्यासह महिला शिवसैनिकांनी मोदी सरकारला माझा देश माझं कुंकू या अभियानातून कुंकू पाठविण्याचा निर्धार व्यक्त केला.

Leave a Reply

Back To Top