मराठा सेवा संघाचे कार्य अनुकरणीय, समाजहिता साठी नेहमीच सोबत राहीन – खासदार प्रणिती शिंदे

मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्काराचे वितरण सोहळा

मराठा सेवा संघाचे कार्य अनुकरणीय, समाजहितासाठी नेहमीच सोबत राहीन- खासदार प्रणिती शिंदे

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१४ सप्टेंबर २०२५- पंढरपूर येथील मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनानिमित्त कर्तव्यनिष्ठ सेवा पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम खासदार प्रणिती ताई शिंदे यांच्या हस्ते टी.पी.ओ.सेमिनार हॉल इंजिनिअरिंग कॉलेज गोपाळपूर पंढरपूर येथे संपन्न झाला.

यावेळी बोलताना खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की,मराठा सेवा संघाचे कार्य अतिशय चांगले असून मी नेहमीच त्यांच्या सोबत राहिले आहे.यापुढेही त्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहीन. समाजहिताचे काम करणाऱ्या कर्तव्यनिष्ठ व्यक्तींचा आज येथे सन्मान करण्यात आला. या सन्मानामुळे समाजात चांगले कार्य करणाऱ्यांना प्रेरणा मिळेल आणि अनेक लोक पुढे येऊन समाजकार्यात सहभागी होतील. समाजासाठी निःस्वार्थीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे कौतुक करणे ही काळाची गरज आहे. मराठा सेवा संघाने आजवर दाखवलेली बांधिलकी व समाजाभिमुख काम यामुळे नवीन पिढीलाही योग्य दिशा मिळेल.खासदार प्रणिती शिंदे यांनी मराठा सेवा संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार समाधान आवताडे,डॉ.बी.पी.रोंगे सर, पोलीस उपनिरीक्षक संतोष जगतप, महावितरणचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे,जिल्हा काँग्रेस उपाध्यक्षा सुमनताई पवार,काँग्रेस उपाध्यक्ष संदीप पाटील,किरण घाडगे,नितीन जाधव सर, ह.जा. भोसले गुरूजी, बाळासाहेब बागल, प्रशांत शिंदे,अमर सूर्यवंशी,राहुल पाटील, नितीन शिंदे,अरुण फाळके,भारत पाटील सर,जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज यलगुलवार आदी उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे संयोजक मराठा सेवा संघाचे नितीन जाधव सर,एम.एन.गायकवाड, नितीन आसबे आणि श्री.रकटे होते.

Leave a Reply

Back To Top