आमदार अभिजीत पाटील यांच्या माढा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी केली पूर पाहणी

मुख्यमंत्री यांनी थेट बांधावर येऊन केली पूर परिस्थितीची पाहणी

आमदार अभिजीत पाटील यांच्या माढा मतदारसंघात मुख्यमंत्र्यांनी केली पूर पाहणी

सरसकट पंचनामे करून तात्काळ मदत मिळावी आमदार पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

माढा/ज्ञानप्रवाह न्यूज – आमदार अभिजीत पाटील यांच्या माढा मतदारसंघातील सिना दारफळ व निमगाव माढा येथे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली.

माढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील यांनी या सर्व पूर पाहणीची माहिती मुख्यमंत्री यांना दिली. आमदार अभिजीत पाटील यांनी सरसकट पंचनामे करून शेतकरी तसेच दुकानदार व्यापारी व अनेक शेतकऱ्यांची त्यांना तत्काळ खरगोश मदत मिळावी यासाठी आमदार अभिजीत पाटील यांनी मागणी केली.

यावेळी सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील, माढाचे विद्यमान आमदार अभिजीत पाटील, माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top