लहुजी वस्ताद चौक ते (बायपास) गोपाळपूर रोड मंगळवेढा आणि संतपेठ शाळा नं 7 परिसरात खड्ड्यातील रस्ते व ड्रेनेज दुरुस्ती

लहुजी वस्ताद चौक ते (बायपास) गोपाळपूर रोड मंगळवेढा आणि संतपेठ शाळा नं 7 परिसरात खड्ड्यातील रस्ते व ड्रेनेज दुरुस्ती

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०९/२०२५ – संतपेठ पंढरपूर या परिसरात काही दिवसांपासून रस्त्यावर जड वाहतुक आणि अतिपावसामुळे मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. हा पंढरपूर मंगळवेढा बायपास रोड असल्यामुळे जड वाहतूक,स्कूल बस,टू व्हीलर आणि शाळकरी मुले व कॉलेजचे विद्यार्थी यांची एसटी स्कुल बसेसच्या माध्यमातून सातत्याने वाहतूक सुरू असते.

या रस्त्यावर आधिच अनेक स्पिडब्रेकर्स आहेत त्यात पावसाने आणि जड वाहतूकीमुळे मोठ मोठे खड्डे पडले आहेत.वेग कमी केला तर वाहन खड्ड्यातून बाहेर पडत नाही वेग वाढवला तर तोल सुटून छोटे मोठे अपघात घडत आहेत.

या भागातील घरे ही रस्त्यालगत असल्याने अपघाताला निमंत्रण दिले जाते.त्यांना रोज या ठिकाणी खूप कसरत करावी लागते, येथील वृद्ध महिला विद्यार्थ्यांना व नागरिकांना संतपेठ आणि परिसरातील लहान मुलांना याचा खूप त्रास सहन करावा लागत आहे.पावसाचे पाणी या खड्ड्या मध्ये साठून त्यांची दुर्गंधी पसरत असून डेंग्यू मलेरिया विषाणूजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.

लहुजी वस्ताद चौक,गोपाळपूर ते मंगळवेढा आणि शाळा नंबर 7 या परिसरातील विद्यार्थी शाळेला जात असतात.या खड्ड्यामधून अनेक वाहने मोठ्या प्रमाणात जात असतात त्यामुळे नागरिकांचा किंवा लहान मुलांचा कोणचाही या खड्ड्यामध्ये पडून कोणाचाही जीव जाऊ शकतो याला जबाबदार कोण आहे.तसेच काही ड्रेनेज झाकणं सुद्धा खाली वर झाली आहेत. या परिस्थितीत टू व्हीलर किंवा लहान मुले सायकल चालवताना आपला जीव मुठीत घेऊन जावं लागतंय नाहीतर गंभीर दुखापत होऊ शकते.नवरात्र उत्सव, बुद्ध पौर्णिमा, दसरा व शाळेचे विद्यार्थी या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी होत आहे असे सांगून स्व राजाराम नाईकनवरे प्रतिष्ठान व सामाजिक संस्थाचे समाजसेवक दिपक राजाराम नाईकनवरे यांनी नगरपालिका प्रशासनाने तातडीने प्राधान्याने लक्ष देऊन काही दुर्घटना घडण्याआधी दुरुस्ती करून घ्यावी असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Back To Top