27 सप्टेंबर 2025 जागतिक पर्यटन दिन सरकोली पर्यटन स्थळावर उत्साहात साजरा
सोलापूर सोशल फाउंडेशनच्या मार्गदर्शनपर पर्यटन सप्ताह पहिला दिवस

सरकोली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७ सप्टेंबर २०२५-सरकोली कृषी व तिर्थक्षेत्र पर्यटन स्थळावर आज मोहोळचे माजी आमदार यशवंत माने यांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करून उद्घाटन करण्यात आले.

माजी आमदार यशवंत माने यांनी 2024 मध्ये जैन समाज मंदिरासाठी निधी दिला होता त्याचे काम पूर्ण झाले आहे त्याचे उद्घाटन आज माजी आमदार यशवंत माने यांच्या हस्ते करण्यात आले.जैन समाजाच्या वतीने माजी आमदार यशवंत माने यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.यावेळी बोलताना माजी आमदार यशवंत माने यांनी समाज मंदिराचा दुसरा मजला बांधकाम निधीसाठीही प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

माजी आमदार यशवंत माने यांच्या उपस्थितीत गावातील विद्यार्थी,भजनी मंडळ,गावकरी बांधव यांनी हातात रोपे घेऊन भजन व जयघोष करीत वृक्ष दिंडी काढण्यात आली. माजी आमदार यशवंत माने यांनी सरकोली पर्यटन स्थळाला काॅंक्रिट रस्त्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागा कडून उपलब्ध करून दिला होता.त्याचेही काम पूर्ण होत आले आहे त्याचीही पहाणी केली.तसेच पर्यटन स्थळा वरील विकास कामे,वृक्षारोपण याठिकाणी भेट दिली आणि समाधान व्यक्त केले.

त्यानंतर ग्रामदैवत श्री भैरवनाथाचे दर्शन घेतले.स्मृतीशेष आमदार भारत नाना भालके सांस्कृतिक भवनमध्ये आण्णासाहेब भोसले सर व रामचंद्र कराळे यांच्या हस्ते माजी आमदार यशवंत माने यांना फळाचे रोप देऊन सरकोली ग्रामस्थांच्यावतीने सन्मानित करण्यात आले.

यावेळी बोलताना माजी आमदार यशवंत माने म्हणाले की सरकोली हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे.या गावची भोसले घराण्याची कन्या महाराणी येसूबाई उर्फ आऊसाहेब बाबाजी डफळे चव्हाण यांनी जत संस्थान ची महाराणी म्हणून 48 वर्षे राज्यकारभार केला आहे असे हे ऐतिहासिक व दोन नद्यांच्या संगमावर वसलेले निसर्ग सौंदर्याने नटलेले गाव आता पर्यटन क्षेत्रात विकसित होत आहे.मला या गावाने भरभरून प्रतिसाद दिला आहे.मी आमदार असताना गावाच्या विकासासाठी भरभरून निधी दिला आहे.यापुढेही सरकारच्या विविध योजनांमधून निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन.इथल्या जल पर्यटनासाठी वैयक्तिकरित्या एक बोट घेऊन देतो.लहान मुलींच्या विनंतीनुसार बगीचा मधील खेळणीही देणार आहे. तसेच भावाच्या कंपनी तर्फे या पर्यटनस्थळ विकासासाठी जास्तीत जास्त मदत करेण.माझे एक मित्र आहेत त्यांच्या कडून दहा गुंठ्यांत पक्षांसाठी किर्र दाट झाडी लावून देण्यात येतील.आताच त्यांच्याशी बोललो आहे.पर्यटन स्थळ हे स्थानिक नागरिकांना रोजगार व व्यवसाय निर्माण करते व पर्यटकांना आकर्षित करते.पर्यावरण संरक्षण करते.पक्षांना विसावा अन्न,फळे निर्माण करते.या पर्यटन स्थळ निर्मितीसाठी इथल्या गावकरी, देणगीदार व श्रमदान सेवेकरी यांनी अथक परिश्रम घेतले आहेत त्यांचे विशेष अभिनंदनीय करतो असे म्हणाले.

प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक हानुमंत भोसले सर यांनी आभार मानले.आज शिवरत्न माॅलचे पिसे बंधू यांनी मुलांना बिस्कीट पुडे वाटले.तसेच कवी संमेलनासाठी येणाऱ्या रसिकांना नाष्टा देणार असल्याचे सांगितले.

रविवार दि 28-9-25 रोजी सकाळी 10-00 वा सरकोली पर्यटन स्थळावर श्री भैरवनाथ मंदिर समोरील स्मृतीशेष आमदार भारत नाना भालके सांस्कृतिक भवनमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कवींचे कवी संमेलन मान्यवर मंडळीच्या उपस्थितमध्ये आयोजित करण्यात आले आहे तरी सर्वांनी उपस्थित राहावे अशी विनंती विलास श्रीरंग भोसले मा पोलीस अंमलदार यांनी केली आहे आणि दात्यांचे आभार मानले.