नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुक नियोजन बैठक संपन्न

नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुक नियोजन बैठक संपन्न

शहरातील सर्व मिरवणूक मार्गाची संबंधित विभागांची पाहणी

मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज दि.30/09/ 2025- आज रोजी मंगळवेढा पोलीस स्टेशन येथे आगामी नवरात्र श्री शक्ती देवी उत्सव मिरवणुका नियोजन अनुषंगाने एसडीपीओ डॉ.बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार श्रीमती जाधव मॅडम,नगरपालिकेचे प्रशांत सोनटक्के (नगर अभियंता ),तुषार नवले (नगर रचनाकार), एम एस सी बी चे बाबासाहेब जावीर ( लाईनमन) व भारत जाधव (फोरमन), पोलिस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे तसेच पोलीस स्टेशनकडील अधिकारी व अंमलदार यांचे उपस्थितीत मंगळवेढा शहरातील सर्व नवरात्र उत्सव मंडळाचे पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिकांची मीटिंग सकाळी 11:30 ते दुपारी 12 :30 या वेळेत घेण्यात आली असून त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन सर्व मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष यांचे सर्वानुमते प्रत्येक मंडळांनी मिरवणुकी दरम्यान केलेले देखावे जनतेला चांगल्या प्रकारे बघता यावेत व सर्व मिरवणुका सुरळीत पार पाडाव्यात याकरिता श्री चोखामेळा चौक व मुरलीधर चौक येथे प्रत्येक मंडळांनी फक्त दोन गाणी वाजवण्या बाबत सहमती दर्शवली.तसेच उपस्थितांना वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सूचनां प्रमाणे मार्गदर्शन करून योग्य त्या सूचना देण्यात आलेले आहेत.

सदर बैठकीनंतर मंगळवेढा शहरातील सर्व मिरवणूक मार्गाची पाहणी नगरपालिका, तहसील कार्यालय,MSEB चे लाईनमन आणि नवरात्र उत्सव मंडळाचे प्रतिनिधी यांचे समवेत पाहणी करण्यात आली असून संबंधित सर्व विभागांना मिरवणूक मार्गावरील अडथळे दूर करण्याबाबत समज देण्यात आली.

Leave a Reply

Back To Top