डहाणू पोलीस ठाणे व वानगाव पोलीस ठाणे यांची पूरपरिस्थितीत उल्लेखनीय कामगिरी

पालघर पोलीस दलास पुरामध्ये अडकलेल्या एकूण ६६ महिला व लहान मुले यांना सुखरूपपणे बाहेर काढण्यात यश

डहाणू पोलीस ठाणे व वानगाव पोलीस ठाणे यांची उल्लेखनीय कामगिरी

पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज –दि.२६/०९/ २०२५ ते दिनांक २९/०९/२०२५ रोजी पर्यंत भारतीय हवामान खात्याने पालघर जिल्ह्याला अतिवृष्टीचा (रेड अलर्ट) इशारा दिला होता. त्याअनुषंगाने यतिश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर यांनी जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना आपआपले पोलीस ठाणे हद्दीमध्ये सतर्क राहुन संभाव्य पाणी भरण्याची ठिकाणे, पुर परिस्थीती निर्माण होण्याची ठिकाणे व सखल भाग इत्यादी परिसरात योग्य त्या उपाय योजना करण्याच्या सुचना दिल्या होत्या.

दिनांक २८/०९/२०२५ रोजी रात्री ०८.०० वाजताचे सुमारास डहाणु पोलीस ठाणे यांचे डायल-११२ वर कॉल आला की,चरी- आशा गड रोडवर धोडीपाडा ब्रिजवर एक टेम्पो ट्रॅव्हलर गाडी पाण्यात बंद पडली आहे. बसमध्ये एकुण १६ महिला असुन तात्काळ मदत हवी असल्याचे सांगितले. त्याप्रमाणे डहाणु पोलीस ठाण्यात डायल-११२ कर्तव्यावर असलेले पोहवा काशिराम उंबरसाडा, पोना गणेश गावीत यांनी तात्काळ तेथे पोहचुन परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सदरची बाब तात्काळ किरण पवार पोलीस निरीक्षक डहाणू पोलीस ठाणे यांना कळवून मदतीसाठी अतिरीक्त पोलीस स्टाफ मागवुन घेतला.सदर ठिकाणी श्रीमती अंकिता कणसे उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग, पोना किरण पवार डहाणू पोलीस ठाणे, सपोनि/तुषार पाचपुते वानगाव पोलीस ठाणे तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार, आरसीपी पथकाचे अंमलदार असे घटनास्थळी पोहोचले. सदर ठिकाणी बस क्रमांक DD03/Q/9303 मध्ये अडकलेल्या सर्व १६ महिलांना व बस ड्रायव्हरला दोरीच्या सहाय्याने अग्नीशामक दल, आशागड ग्रामपंचायतीचे ग्राम महसुल अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने पाण्यामधुन सुखरुप बाहेर काढले त्यामुळे पुढील संभाव्य मोठा अनर्थ टळला.

नमूद महिला या देवदर्शनासाठी वाणगांव बाजुकडून संतोषी मंदीर आशागड व तेथुन पुढे महालक्ष्मी देवीचे दर्शनासाठी जात असल्याचे समजले.यतिश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर,विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन महिलांकडे विचारपुस करून सर्व महिलांना जेवण देऊन त्यांना शासकिय विश्राम गृह, डहाणू येथे सुरक्षीतरित्या पोहचविण्यात आले.

त्याचप्रमाणे सपोनि/तुषार पाचपुते, वानगाव पोलीस ठाणे यांना स्थानिक नागरिकांकडून माहिती मिळाली की, वानगाव-चारोटी मुख्य रस्त्यावर मौजे पिंपळशेत येथे पाण्यामध्ये MH48-DC- 8759 क्रमांकाची खाजगी बस बंद पडली आहे. सदर माहिती मिळताच पोलीस स्टाफसह सपोनि/तुषार पाचपुते हे सदर ठिकाणी तात्काळ पोहोचून पाण्यामध्ये बंद पडलेल्या नमूद बसमधील एकूण ५० महिला व लहान मुले यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढून दुसऱ्या वाहनाने वानगाव येथे पाठवून त्यांच्या राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सदर बस ही वसईहून बोईसर मार्गे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी निघाली असल्याचे समजले.

सदरची कामगिरी ही यतिश देशमुख पोलीस अधीक्षक पालघर,विनायक नरळे अपर पोलीस अधीक्षक पालघर, विकास नाईक उपविभागीय पोलीस अधिकारी बोईसर विभाग,श्रीमती अंकिता कणसे उप विभागीय पोलीस अधिकारी डहाणू विभाग यांचे मार्गदर्शनाखाली डहाणू व वानगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच आरसीपी पथकाचे अंमलदार यांनी पार पाडली आहे.

Leave a Reply

Back To Top