सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिमेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा प्रत्यक्ष सहभाग

सोलापूर जिल्ह्यात पुरग्रस्त गावात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम …

मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचा स्वच्छता मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग

सोलापूर ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०१/१०/२०२५ – सोलापूर जिल्हा परिषदेने पुढाकार घेत सिना व भीमा नदी काठच्या ८० गावांत स्वच्छता मोहिम युध्दपातळीवर सुरू केली आहे. जिल्हा परिषदेचे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी माढा तालुक्यातील उंदरगाव, रीधोरे व तांदुळवाडी ग्रामपंचायत मध्ये स्वतः प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला व सर्व पूरग्रस्त गावे स्वच्छ करण्याचा संकल्प केला.

आजपासून पुरग्रस्तभागात युध्दपातळीवर स्वच्छता मोहिम सुरू करणेत आली आहे. पुराचे पाणी शाळा व अंगणवाडी व ग्रामपंचायत कार्यालयात तसेच सार्वजनिक इमारती मध्ये शिरल्यामुळे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे.

आज सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी उंदरगाव येथे भेट देऊन ग्रामस्वच्छता अभियानात सहभाग घेतला. स्वतः प्लास्टिक कचरा वेचत त्यांनी ग्रामस्थांनी प्रेरणा दिली.जिल्हा प्रशासन,ग्रामपंचायत व स्थानिक नागरिकांच्या सहभागातून जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये स्वच्छता मोहीम व त्यासाठी आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री पुरवली जात आहे. पूरग्रस्त कुटुंबीयांच्या परिसरात त्यांनी स्वच्छतेची कामे स्वतःहून करून नागरिकांना धीर दिला. अशा गंभीर संकट काळात शासन सर्वतोपरी मदतीसाठी सोबत असल्याचे आश्वासन सिईओ कुलदीप जंगम यांनी दिले. याप्रसंगी उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, गटविकास अधिकारी श्री.सुळे उपस्थित होते.

त्यानंतर पूरग्रस्त वाकाव ग्रामपंचायतीला भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला. यावेळी लोकांच्या अडचणी समजून घेताना शासनाच्या सर्व विभागांकडून हाती घेतलेल्या उपाययोजनांबाबत लोकांना माहिती देऊन शासन आपल्या अडचणीत साथ देईल याची ग्वाही कुलदीप जंगम यांनी दिली.

यावेळी वाकाव ,राहुल नगर व इतर पूरग्रस्त ग्रामपंचायत परिसरात वीजपुरवठा, रेशन धान्य उपलब्धता, जनावरांसाठी चारा, आरोग्य सुविधा व स्वच्छता यासंबंधी सविस्तर आढावा घेण्यात आला. तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित विभाग प्रमुखांना देण्यात आल्या.

जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी कटीबद्ध- सिईओ कुलदीप जंगम

जिल्हा प्रशासन पूरग्रस्तांच्या मदत व पुनर्वसनासाठी कटिबद्ध असून आवश्यक त्या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, असे ग्वाही आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली. स्वतः स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन स्वच्छतेची सेवा सर्व गावात देणेचे आवाहन ग्रामस्थांनी केले.

केवड मध्ये ग्रामस्थांनी दिली यंत्रसामग्री

हा सर्व गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायतीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी पंचायत , सरपंच ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य, प्राथमिक शिक्षक गावातील ग्रामस्थ स्वच्छतेची सेवा देत आहेत.

माढा तालुक्यातील केवड येथे ग्रामस्थांनी जेटींग मशीन, ट्रॅक्टर उपलब्ध करू दिले आहे. पिण्याच्या पाण्याचे शुध्दीकरणाबरोबर शाळांच्या खोल्यात साचलेला गाळ काढून जंतुनाशक पावडर टाकून परिसर स्वच्छतेसाठी मोहिम हाती घेणेत आली आहे. ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत भुजबळ, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अमोल जाधव हे जिल्हा नोडल अधिकारी म्हणून या स्वच्छता मोहिम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.

माढा तालुक्यातील केवड तसेच तांदुळवाडी येथे ग्रामस्थांनी मना पासून ही मोहिम हाती घेतली आहे.पूरग्रस्त ग्रामपंचायत उदरगाव ता.माढा येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव व गट विकास अधिकारी सुळे यांनी भेट देऊन स्वच्छता मोहिमेची पाहणी करून ग्रामस्थांनी मार्गदर्शन केले.सरपंच यांच्यासह अधिकारी, कर्मचारी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.

ग्रामस्थांचे पुढाकाराने शाळा चकाचक..

सरपंच प्रतिनिधी राजेंद्र पाटील, ग्रामसेवक महेश माने, मुख्याध्यापक बाळासाहेब भोईटे,सहशिक्षक प्रदीप जाधव, वैभव चव्हाण, अण्णासाहेब काशिद यांनी पुढाकार घेत स्वच्छता मोहिमेसाठी प्रयत्न केले आहेत.

Leave a Reply

Back To Top