आमदार अभिजीत पाटील यांनी धनगर समाजाला दिला पाठिंबा

आमदार अभिजीत पाटील यांनी दिला धनगर समाजाला पाठिंबा

जालना येथे उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांचे सुरू असलेले धनगर समाजाच्या आरक्षणासाठी उपोषणास आमदार अभिजीत पाटील पाठिंबा दिला

माढा/ ज्ञानप्रवाह न्यूज- जालना येथे धनगर समाजासाठी आमरण उपोषण करत असलेले दिपक बोऱ्हाडे यांची माढा विधानसभेचे आमदार अभिजीत पाटील यांनी भेट घेऊन त्यांना धनगर समाजाच्या एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीला पाठिंब्याचे पत्र दिले.‌

सलग १५वा दिवस उपोषणाचा असून धनगर समाजाच्या हक्काच्या या लढ्यात आम्ही सर्वजण खंबीरपणे त्यांच्या सोबत उभे आहोत. मायबाप सरकारने तात्काळ या मागणीची दखल घेऊन धनगर समाजाला न्याय द्यावा, हीच अपेक्षा आमदार अभिजीत पाटील यांनी व्यक्त केली.

यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे युवक जिल्हाध्यक्ष सुरज देशमुख, मा.नगरसेवक आदित्य फत्तेपूरकर, आनंद पाटील, विठ्ठल पाटील, अतुल चव्हाण, बाळासाहेब हाके, प्रवीण कोळेकर, सिद्धेश्वर बंडगर, विठ्ठल रणदिवे, दत्तात्रय येडगे, आनंद मदने उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top