कोठाडिया ग्रुप व अर्थालय ग्रुप यांच्या वतीने सौ.वृषाली विशाल मेहता यांचा सन्मान
GST कामकाज करताना व्यापार्यांशी सहकार्य, पारदर्शकता व कायद्याच्या चौकटीत न्याय देणे हेच त्यांच्या कामाचे मूलतत्त्व -सौ.वृषाली विशाल मेहता
पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – सौ.वृषाली विशाल मेहता मोडनिंब या जीएसटी GST अधिकारी (GST Officer) म्हणून सोलापूर येथे पदोन्नत झाल्या.1999 ते 2001 या कालावधीत त्या कोठाडिया ग्रुप व अर्थालय ग्रुप कार्यालयात सीए (CA) शिकत होत्या. पुढे 2004 मध्ये त्यांनी CA कोर्स सोडून MPSC परीक्षा दिली व त्यामध्ये यशस्वी होऊन PSI पदावर निवड झाली. पण त्यांचं स्वप्न होतं GST विभागात अधिकारी होण्याचं.त्यांनी आपल्या प्रबळ इच्छाशक्तीने आणि अथक मेहनतीने GST विभागात अधिकारी होण्याचं मोठं यश संपादन केलं.
2012 साली त्यांनी पुन्हा MPSC परीक्षा दिली आणि त्यात यश मिळवून त्यांनी GST निरीक्षक (Inspector) म्हणून मुंबई माझगाव येथे काम सुरू केलं. त्यानंतर त्या सोलापूर व धाराशिव जिल्ह्यांमध्ये GST निरीक्षक म्हणून कार्यरत होत्या.

त्यांच्या यशामागे त्यांच्या पती विशाल मेहता जे दागिने व्यवसायाशी संबंधित आहेत, यांनी खूप साथ आणि प्रोत्साहन दिले, ज्यामुळे त्यांचा करिअर पुढे जाण्यास मदत झाली असे सौ.वृषाली विशाल मेहता सांगतात.
आता त्या GST अधिकारी (GST Officer)म्हणून सोलापूर येथे पदोन्नत झाल्या असून, हा आमच्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे.सौ.वृषाली विशाल मेहता यांचा यशाचा पाया आमच्या कार्यालयात घातला गेला होता आणि कोठाडिया ग्रुप व अर्थालय ग्रुप यांना त्यांच्या या यशाचा भागीदार होण्याचा मान मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे असे कोठाडिया ग्रुप व अर्थालय ग्रुप चे सर्वेसर्वा सीए संजीव कोठाडिया यांनी सांगितले.अर्थालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये त्यांचा सत्कार करण्यात आला.
या सत्काराला उत्तर देताना सौ.वृषाली विशाल मेहता म्हणाल्या की GST कामकाज करताना व्यापार्यांशी सहकार्य, पारदर्शकता व कायद्याच्या चौकटीत न्याय देणे हेच त्यांच्या कामाचे मूलतत्त्व राहील.
त्यांची यशोगाथा नवतरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहे कारण त्या जिद्द,चिकाटी आणि निष्ठेमुळे यशाच्या सर्वोच्च स्थानी पोहोचल्या आहेत.त्यांना कोठाडिया ग्रुप व अर्थालय ग्रुप परिवारातर्फे शुभेच्छा देण्यात आल्या.