पालघर पोलीस दलाला १२ तासांचे आत खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस अटक करण्यात यश
मोखाडा पोलीस ठाण्याची कारवाई
पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज-दि.०६/१०/२०२५ रोजी फिर्यादी सोमनाथ नवसु फुफाणे वय २० वर्षे, व्यवसाय शेती/मजुरी, रा.सातुर्ली, ता.मोखाडा,जि.पालघर यांनी मोखाडा पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली की,फिर्यादी व त्यांचे वडील नवसु लाडक्या फुफाणे वय ५५ वर्षे हे त्यांचे घरी असताना दि.०६/१०/ २०२५ रोजी दुपारी १२.४५ वाजताचे सुमारास जितेंद्र उर्फ जितु जयराम पाटील, वय ३१ वर्षे,रितेश उर्फ गुड्डा तुकाराम पाटील, वय २३ वर्षे,प्रमोद उर्फ पन्या चिंतामण वारघडे, वय २५ वर्षे सर्व रा. सातुर्ली ता.मोखाडा,जि.पालघर यांनी फिर्यादीचे वडील नवसु लाडक्या फुफाणे वय ५५ वर्षे यांनी शेतालगत असलेल्या नदी पात्रात विषारी औषध टाकुन मासे मारु नका असे सांगितल्याचा मनात राग धरुन फिर्यादीचे वडीलांना व फिर्यादी यास फिर्यादीचे शेतावरील घरी येवुन शिवीगाळी व दमदाटी करुन लाकडी दांडक्याने मारहाण करुन फिर्यादीचे वडीलांना कास-याने बांधुन रस्त्याने ओढत सातुर्ली गावात मारझोड करत नेवुन गावात तीनही आरोपीतांनी पुन्हा फिर्यादीचे वडीलांना लाथाबुक्यांनी व लाकडांनी मारहाण करुन जिवे ठार मारले आहे अशी फिर्याद दिल्याने मोखाडा पोलीस ठाणे येथे गु.र.नं. १८१/२०२५ भारतीय न्याय संहिता १०३ (१), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५), प्रमाणे दि.०६/१०/२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली मोखाडा पोलीस ठाणेचे वेगवेगळी तपास पथके तयार केली. सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी गुन्ह्यातील आरोपीत जितेंद्र उर्फ जितु जयराम पाटील,रितेश उर्फ गुड्डा तुकाराम पाटील,प्रमोद उर्फ पन्या चिंतामण वारघडे सर्व रा.सातुर्ली ता.मोखाडा, जि. पालघर यांचा शोध घेवून १२ तासांचे आत वर नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास हा उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर जव्हार विभाग हे करत आहेत.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक यतिश देशमुख पालघर,अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे पालघर, उपविभागीय पोलीस अधिकारी समीर मेहेर जव्हार विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि/प्रेमनाथ ढोले प्रभारी अधिकारी मोखाडा पोलीस ठाणे, पोउपनि/श्रीकांत दहिफळे, पोउपनि/प्रतिक पोकळे,पोउपनि/कार्तिक कडु, पोहवा/भास्कर कोठारी, पोहवा/कव्हा, पोहवा/गोरे, पोहवा/भरसट, पोहवा/भोये सर्व नेमणुक मोखाडा पोलीस ठाणे यांनी केली आहे.