सेक्सटॉर्शनचा सापळा


एक फोटो, आणि आयुष्य उद्ध्वस्त– सावध राहा,सतर्क राहा

डिजिटल जगात आता सेक्सटॉर्शन म्हणजेच खाजगी फोटो किंवा व्हिडिओ वापरून ब्लॅकमेल करण्याची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत.अशा गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी आणि त्यांचा सामना करण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाचे उपाय जाणून घ्या — नांदेड पोलीस

सापळ्यात अडकू नका
कधीही खाजगी फोटो वा व्हिडिओ कुणालाही पाठवू नका.
मागितलेली रक्कम देऊ नका — कारण पैसे दिल्यानेही ब्लॅकमेल थांबत नाही.
सर्व चॅट, कॉल रेकॉर्ड, प्रोफाइल लिंक यांचे स्क्रीनशॉट जतन करा.
स्मार्ट बना, सेफ रहा.
आरोपीला तत्काळ ब्लॉक करा.
सर्व पुरावे सुरक्षित ठिकाणी ठेवा.
तातडीने तक्रार करा —
सायबर हेल्पलाइन: 1930
ऑनलाइन तक्रार: www.cybercrime.gov.in
धोक्याच्या प्रसंगी: 112

कायदेशीर मदतीसाठी पुढे या
स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवा. घाबरू नका — कारण कायदा तुमच्या पाठीशी आहे.
सतर्कता म्हणजेच सुरक्षा
तुमचा प्रोफाइल सुरक्षित ठेवा, अनोळखी विनंत्या नाकारा आणि संशयास्पद प्रसंगात त्वरित मदत घ्या.
लक्षात ठेवा
ऑनलाईन जगात सावधगिरी हीच सर्वात मोठी सुरक्षितता आहे.

